‘निसर्गाची ही चौफेर सौंदर्य उधळण’; प्रा तारका रूखमोडे

‘निसर्गाची ही चौफेर सौंदर्य उधळण’; प्रा तारका रूखमोडेपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

शुक्रवारीय हायकू काव्य परीक्षण

कृष्णसावळ्या मेघांची आकाशात गर्दी जाहली..आषाढाच्या सरींनी वसुंधरा त्यात चिंब चिंब न्हाली..सृजनसोहळा झाला सुरू.. सृष्टी लागली बहरू..चहुकडे जलतरंग त्यात पाते लागले डवरू..हिरवीकंच काया तिची मनास लागली खुणावू..शुभ्र मोती झेलण्या ललनारूपी कमळीणीचं मन जलतरंगी लागलं रेंगाळू..खरंच निसर्गाची ही चौफेर सौंदर्य उधळण बघून तिच्या भावभावनांना अंकूर न फुटले तरंच नवल..!

पाऊस हा मनाला अंकुरीत करणारा. मर्त्याला संजीवनी देणारा.अचेतनात चेतनत्व ओतणारा.म्हणूनच तिला तो निर्जीव घटकही सजीव वाटू लागतो,तिला तिचा तो सखा भासू लागतो,अलवारपणे ती त्या थेंबांच्या प्रेमात पडते,त्यांना तळहाती झेलते मोत्यांना बघून तिचा सारा शीण निघून जातो.त्याच्या स्पर्शाने ती रोमरोमी उर्जित होते,नवयौवनेचा भाव तिच्या मनी बहरतो,चिरतरुण असल्याचा भाव तिला गंधवती करतो.त्या जलधारा तिच्या गौर कायेवर जणू शृंगाराची नक्षी रेखतात,कटी करांवरून वाहणारा नीर या वनितेला नवा साज देतो,ती उर्जित होते,व ही नार अनावृत मोहवू लागते.तिच्या मनाचं तुषाराशी झालेलं संगम किती हृदयगंम..!

ही विलासिनी जेव्हा पाऊस रुपी रत्न मण्यांचे दीप हाती घेते तेव्हा तिचं मुखवलय किती तेजाळतं.. निसर्गाच्या सौंदर्यात अजूनच भावभावनासौंदर्यास प्रतिबिंबित करणारी ही ललना पाऊस धारेच्या मिलन सुखास आसुसलेली व त्याच्याशी एकरूप झालेली ही विलासिनी..निर्जिव घटकालाही सजिव बनवणारी ही प्रेमवेडी.. खरंच किती बोलकं चित्र आ.राहुल सरांनी दिलेलं..

खरंच..जीवन चक्रात सुखदुःखाचे भोग तर नित्याचेच असतात,पण विशिष्ट ॠतूच्या आगमनाने चित्तवृत्तीत होणारे बदल व सृष्टी कल्याणासाठी पावसाचे आगमन नि मानवी हृदयाचं भावनिक सत्य उलगडण्यासाठीच जणू सरांनी हे चित्र दिलेलं..

यावर आपणही खरे उतरलेले. नितांत सुंदर भावरचनांचा पाऊस पडलेला..कुणास दाहशामक सखा आठवला, तर कुणी प्रेमविव्हल विरही मनाची नाजूक व्यथा मांडलेली,कोणी पावसाचं विशेषत्व तर कोणी सृष्टीचं व ललनेचं सौंदर्य खुलवलेलं तर कुठे चिरयौवना कांताचे केलेलं अहर्निश चिंतनही जाणवलं..आज प्रेमाची उत्कटता, भावाची मृदुता,अर्थांतरण्यासाची विश्वात्मता जाणवली. खरंच प्रेमवेडीला चेतन अचेतन असा फरक नसतोच कळत ते समर्पण एकरूपत्व असतं भावनांचं..कवीचं तरल मनही तर असंच असतं,आज सर्वांच्या जलधारा मोत्या परीस बरसल्या तेव्हा सर्वांचे अभिनंदन 💐💐असेच लिहिते व्हा..फक्त कलाटणी हृदयस्पर्शी आशयगर्भ असू द्या..
आ. राहुल सर आपण मला परीक्षण लेखणीची संधी दिली त्याबद्दल आपले हृदयस्त ऋणानुभार..🙏

प्रा तारका रुखमोडे गोंदिया

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles