माझा थायलंड प्रवास भाग २

माझा थायलंड प्रवास: भाग २पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

‘पटाया व्यू पाॅंईट’ येथील दृश्य अतिशय सुंदर म्हणजेच समुद्राचे निळसर पाणी संथ थांबलेले दिसते व त्यावर जहाज जणू उभे आहेत असे भासते . पण खरेतर पाण्याचा प्रवाह वाहत असतो. सायंकाळच्या वेळेला पटाया सिटी लाईटिंगमुळे अतिशय सुंदर दिसते. येथील दुकानासमोर सुऑन सुझान राजाचे व त्यांचा मुलगा चुऑनचे फोटो, पुतळे दिसतात. चौथ्या दिवशी आम्ही सफारी वर्ल्ड बघायला गेलोत. तिकीट काढून आत गेल्याबरोबर एक हजार लोक जेवायला बसतील अशी बेंचची जेवण व्यवस्था असल्यामुळे ते बघून आम्ही थक्क झालो. कुणाची सुध्दा गैरसोय होणार नाही इतक्या व्यवस्थित व्हेज नाॅनव्हेजचे जेवण स्वतः घेता येत होते. जेवण करून ‘डाॅल्फिन शो’ बघितला. यात कौशल्यप्राप्त मुली डाॅल्फिनला त्यांच्या तोंडाच्या दिशेने छोटया मासोळया फेकत व ते बरोबर तोंडात पकडायचे. त्याच्याच पाठीवर बसून पाण्यात फिरणे, गोल राऊंड मारणे, उडया मारणे इत्यादी शो झालेत. त्यानंतर ‘सीलमाशाचा शो” सुरू झाला. प्रशिक्षित मुलींनी फेकलेला हार कॅच करून स्वत:च्या गळयात टाकणे. प्रेक्षकांनी टाळया वाजविल्या की, स्वतः दोन हातानी टाळया वाजविणे. नाकावर बाॅल घेऊन पाण्यात चालणे. हे बघून मूक प्राण्यांचे कौतुक वाटले.

‘स्टंट शो’ यामध्ये मुली हैद्राबाद रामोजी फिल्म इंडस्ट्रीज मध्ये ज्याप्रमाणे स्टंट शो दाखविल्या जातो त्याप्रमाणे तरूण मुले मुली बंदुकीच्या गोळीने गोळया झाडत होत्या. बॅंकेवर हल्ला करणे, घोडयावर उडया मारणे, बाॅम्ब फोडणे, एकमेकांच्या खोडया करणे हे सगळे पाहून बॅंकॉकला ‘इको टेक’ हाॅटेलमध्ये जेवण घेतले. एकोणीस डिसेंबर दोन हजार बावीसला सकाळी पांढरे शुभ्र वस्त्र सर्वांनी परिधान केले. त्याला कारणही तसेच होते. आज आम्ही बुद्ध स्थळ बघणार होतो. ‘व्हट पू नुन’ ६०० वर्ष पूर्वीची ४२ फूट उंच व ८५ फूट लांब गौतम बुद्धाची विशाल मूर्ती होती. येथे वंदना घेण्यात आली ‘व्हट पू काय खो थांग’ इथे सुध्दा गौतम बुद्धाच्या वेगवेगळ्या मुद्रा असलेल्या सुंदर मूर्ती आहेत.

‘फ्रू नुन चांग’ इथे सुध्दा गौतम बुद्धाच्या मोठमोठ्या पितळ धातूच्या मूर्ती व थायलंड देशाच्या राजाची मूर्ती आहे. इथे श्रध्दा म्हणून गोल्डन पेपर बुद्धाच्या मूर्तीला चिपकविले जातात. सहलीचे हे सुखद क्षण अनुभवून नंतर आम्ही बॅंकॉक ते कोलकत्ता व कोलकत्ता ते नागपूर परतीचा प्रवास विमानानेच केला. नागपूर विमानतळावरून सर्वच घरी जाताना भावूक झालेलो. ही एक गोड आठवण घेऊन आम्ही घरी परतलो.

कुसुमलता दिलीप वाकडे
दिघोरी, नागपूर

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles