‘असर’ची हुशारी..

‘असर’ची हुशारी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

आटपाट नगरात होते एक गाव, जिथे राहत होते रंक आणि राव. त्या गावात राहत होते एक विनोद राव, त्यांना होती तीन मुलं पिसा, न्यास आणि असर त्यांची नावं. मोठी होती कन्यारत्न .पहिली बेटी, धनाची पेटी .तिचे होते भारी लाड, तल्लख बुद्धी बोलायची इंग्रजी फाडफाड. पहिलीत असताना दुसरीचं पुस्तक वाचे, सारा वर्ग तिच्या तालावर नाचे. मधला होता मुलगा खास नाव त्याच होतं न्यास. बुद्धी त्याची होती बरी ,नव्हता जास्त हव्यास, बऱ्यापैकी होता त्याचा अभ्यास. तिसरा होता असर ,नको असलेलं कुसर . गोळ्या औषधाचा असर झाला ,मंद बुद्धि जन्माला आला. कितीही शिकवलं तरी समजेना, जरा सुद्धा हलेना, काय करावे कळेना? विनोद रावांनी गुरुजी ठेवले शिकवायला.

गुरुजींनी केला तीनही मुलांचा अभ्यास. असर आहे मुलांमध्ये खास ,असर पिसासारखा नाही शिकू शकत ; त्याला दूरवरच नाही दिसत. त्याला आपण बेसिक शिकवू, वाचन लेखन गणिती क्रिया फक्त एवढेच घेऊ आणि त्याचा अध्ययन स्तर वाढवत जाऊ .गुरुजी लागले कामाला ठेवली नाही कसलीच कसर, तेव्हा कुठे वाचू लागला हा धाकटा असर. न्यास लागला ओरडायला गुरुजी फक्त असर लाच शिकवतात आम्हाला मात्र बोअर करतात, पिसा तर आधीच लिहून खेळायला पळते आणि मला तेच तेच नको वाटते.

आता काय करावं म्हणून केली गुरुजीनी युक्ती तिघांनाही बसवलं वेगळं, अभ्यास वेगळा गणित ते वेगळं. असर , न्यास, पिसा अभ्यासात गुंतून गेले. असर पुढे जावा म्हणून गुरुजी सेल्फी काढू लागले. तिघांची ही परीक्षा झाली तिन्ही मुलं झाली पास .पिसा आली टॉपर ,न्यासने गाठला फस्ट क्लास ,असर झाला बऱ्यापैकी पास. आई, बाबा खुश, गुरुजी खुश ,सगळे खुश सगळीकडे आनंदी आनंद झाला.

शशी मदनकर, ब्रह्मपुरी
======

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles