भारताचा राष्ट्रीय ध्वज..

अहंकार विस्तारला या देहाचापुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

“उत्तम देह बहुमूल्य ठेवा, मानवास दिला देवा,
अहंकार विस्तारतो देहाचा, त्याला सारखा वाटतो हेवा”

मानवाला कितीही दिलं तरी कमीच..! जन्माला येताना अनेक ऋण घेऊन येतो तो. भेटायची सुवर्णसंधी याची जन्मी त्याला दिलेली असते. पण तो ऋण फेडायचं सोडून अहंकारात गुरफटत जातो. आपले हित कशात आहे हे त्याला नेमकं कधीच कळत नाही. कुठून आलो? कुठे जायचं.? काय करायचं? हेच तो मुळात विसरून जातो. त्याला वाटतं मी अमर आहे. रावणच शेवटी..पण त्या रावणाच्या अहंकाराचा शेवट तर होतोच. लंकाही जळून जाते. तसेच मानवाचे सुद्धा आहे.

एकदा केलेली चूकही चूकच आहे हे कळून सुद्धा पुन्हा तीच कृती करतो. पुन्हा पुन्हा करतो, घडवून आणतो आणि मीच बरोबर, तुम्ही चुकीचे हे खापर दुसऱ्यावर फोडतो हा एक अहंकारच. काळानुरूप बदलावं ठीक. पण मी बदलत नाही किंवा बदल करू शकत नाही. बदलणारच नाही हा त्याच्या स्वभावाचा अहंकारच की. स्वार्थासाठी गोड बोलणे आपलं काम झालं की तू तुझ्या घरचा आणि मी माझ्या घरचा.. हा क्षणीक सुखाचा अहंकारच की. जे आपणास येत नाही ..आपल्या जवळ नाही. तेच इतरांचे पाहून त्याची निंदा करतो..तोही एक अहंकारच की. घडीस समाधान देणाऱ्या वासना मनात आल्या की पाप बुध्दी जागृती होते… मी हे करू शकतो. मला स्वातंत्र्य आहे. माझी मतं आणि विचार वेगळे आहेत. इतरांच्या मताशी, विचारांशी जुळवून न घेणे अहंकारच.

मनाला सारासार विचार कळत असूनही, न्याय ,नीती ,धर्म ,सत्य सोडून पापाचा संचय करतो. कधी कधी हा अहंकार क्रोधाची जागा घेतो. हव्यासापोटी लोभ निर्माण करतो ..लोभ पूर्ण झाला नाही तर मत्सर करत राहतो. आणि समोरच्या मनाला त्याच्या काळजाला गरे पाडून शब्दरूपी छळत असतो. शांततेचे धारिष्ट असणारे.. ही अहंकाराचे बोलणे रोज सोशीत जातात. अगदी नम्र होऊन लोकांसमोर निवतात. सडेतोड … कठोर.. टाकून बोलणे… दुर्लक्ष करणे. काही गोष्टीवर वादच घालणे. समोरचा किती नमते घेतो हे पाहून त्याच्यावर आपले विचार लादणे.. त्याच्या स्वातंत्र्य विचाराला तिलांजली देऊन.. अनधिकृत विचार मांडणे हा एक अहंकारच की….

अहंकार ..अहंकार …विस्तारतो देहात, पण कुठंपर्यंत. प्रत्येक गोष्टीला एक शेवट असतोच की… चांगल्या वाईट गोष्टीला शेवट आहेच. अहंकार दुःखाचे कारणच की. मानवाला जाणे आहेच. एखादी गोष्ट निस्वार्थी पणे करणे..अखंड माणूसपण जपणे..नम्र राहणे..ऐकून घेण्याची समजून घेण्याची वृत्ती ठेवणे. समोरच्याच्या अंत:करणातला देव समजून घेणे. अशांनाच देव त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करतो. त्याच्यातच माणुसकीचे दर्शन घडवून आणतो.. दर्शन.मी माझा म्हणण्यापेक्षा आपण, आपलं जपलं तर, अहंकार दूर पळून जाईल. तिथं दैवत्वाची प्रचिती येईल.

“अहंकाराची बाधा नसावी, कधी शिकावं कधी शिकवावं,
कौतुक करण्या माणुसकीचे, मोकळं मनांगण असावं..”

सिंधू बनसोडे, ता.इंदापूर, जि. पुणे
======

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles