शूरवीर..

शूरवीरपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

भारतमाते नकोस गाळू
अशी आसवे आता
तुझ्या कुशितल्या शुर विरांचा
गिरवू आम्ही कित्ता ||

धडधडणाऱ्या तोफा झेलू
झेलू छाताडावर गोळ्या
करु उध्दवस्त बंकर सारे
अन् आतंकवाद्यांच्या टोळ्या
छिन्नविछिन्न करिन चिंधड्या
पापणी डोळ्याची लवता लवता || भारतमाते….

विज्ञानाच्या सखोल ज्ञानातून
हा चंद्र जवळ बघ आला
उंच भरारी तुझी गं माते
आसमंती जल्लोष झाला
आनंदाने तुलाच पहायचे
हे वैरी लयास जाता || भारतमाते….

पोखरतील ते देश आपुला
लावूनी व्यसनांच्या त्या नादी
सावध करुया युवक अपुले
होण्यापूर्वीच ती बरबादी
स्वप्न उद्याचे तरूण आजला
होऊ दे शहिद लढता लढता || भारतमाते….

विलास सूर्यवंशी
वडाळा, मुंबई.
=======

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles