अर्धांगिनी..

अर्धांगिनीपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

कुटुंबाचा आधारस्तंभ
आहे माझी अर्धांगिनी
सुखदुःखात साथ देणारी
बनली जीवनसंगिनी

तिच्याविना संसाराचे
पान माझे हलत नाही
ती नसता घरी तर
हर्षाने मन खुलत नाही

पती पत्नी आम्ही दोघं
संसार रथाची दोन चाकं
तिच्या विना आयुष्यात
काहीच नाही माझं बाकं

सप्तपदितील सात वचने
पाळत असते ती प्रेमाने
संसारातील जबाबदारी
सांभाळते ती आनंदाने

येणारी वादळे क्षमविण्या
बनते कुटुंबाची ढाल
सर्वांना सुरक्षित करून
बने आदर्शाची मिसाल

मानाची ती असते भुकेली
हा तर तिचा हक्क खरा
चला आपण समजून घेऊ
ती ही मानव एक जरा

रांधा वाढा उष्टी काढा
कर्तव्य जपती स्व मनाने
नवपिढी चालविण्यास्तव
मुले प्रसवली आनंदाने

खचून जाता जीवनामध्ये
जगण्याचे ती देती बळ
झाला स्वतःला त्रास तरी
सोसते ती वेदनेची कळ

तिलाही आहेत भावना
जाणून घ्या हो अंतर्मनी
खुप समजून घेत असते
सुरेखा माझी अर्धांगिनी

प्रा. दिनकर झाडे, गडचांदूर
जि. चंद्रपूर
=====

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles