शूरशिपाई..

शूरशिपाई



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

राहतो सज्ज, सैनिक सीमेवर
झेलत उनवारा, पाऊस धारा,
देशरक्षण,करीतो तनमन लावून
अर्पण,करीतो प्राण सारा.

हाती घेऊन, ध्वज तिरंगा
मान देशाची उंचावतो,
शत्रूवर, चढाई करून
भारतदेशाची, शान वाढवितो.

शिस्त,संस्कारांतून अखंड वाहतो
देशप्रेमाचा अमूर्त झरा,
आम्हा,सुरक्षेची हमी, देवून
खांद्यावर, बंदूक घेऊन देतो पहारा.

नजर करडी, निधडी छाती
निरीक्षण,करतो तो चौफर,
चाहूल लागताच,शत्रूची
भुईसपाट त्यास लोळवितो.

छातीवर मिरवितो गर्वाने
शौर्य पराक्रमाचे बिल्ले,
देशप्रेमाचे,मिळते बळ
पाहून,शिवरायांचे गडकिल्ले.

प्रेरणादायी बलिदान त्यांचे
ठेवू,स्थान कायम हृदयात,
नतमस्तक, होऊ सदैव आम्ही
आजन्म,कीर्ती राहील स्मरणात.

बंदूकीच्या गोळ्या, झाडून
शत्रुची दाणादाण उडवी तो,
दूरदृष्टीनें टेहळणी, करून
गुप्त कारस्थाने, उघड करीतो.

निष्ठा,हिम्मत अन औदार्याचीं
करावी किती? स्तुती आम्ही!
घराघरातून, एक शुरशिपाई
देशहितासाठी,करू अर्पण आम्ही.

मायादेवी गायकवाड
ता.मानवत, जि.परभणी
=====

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles