पॅराडाईज इंग्लिश स्कूल येथे स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात साजरा

पॅराडाईज इंग्लिश स्कूल येथे स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात साजरा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सौंदड- गीताई बहुउद्देशीय विकास शिक्षण संस्था सौंदड द्वारा संचालित पॅराडाईज इंग्लिश स्कूल सौंदड येथे सकाळी आठ वाजता माजी ग्रामपंचायत सदस्या गिताबाई राऊत यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी डॉ. मार्गाये साहेब, संस्थाध्यक्ष संतोष राऊत, माजी सरपंच लालचंद खडके, केवलचंदजी शहारे, जीवतू मेश्राम, भरत वर्मा, मंगेश तरोने ,प्रणय ठेंगरे ,गणेश गहाणे, राजेश लंजे आदि प्रतिष्ठित गावकरी यांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आला.

देशासाठी बलिदान करणाऱ्या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमात देशभक्तीपर गीत, विद्यार्थ्यांची भाषणे, देशभक्तीपर नृत्य घेण्यात आले तसेच प्री प्रायमरीच्या विद्यार्थ्यांनी फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
शेवटच्या टप्प्यात प्रमुख पाहुण्यांचं भाषण तथा कवी केवलचंंजी शहारे व डॉ. मार्गाये यांनी आपल्या स्वलिखित कविता सादर केल्या.संस्थेचे संचालक संतोष राऊत यांनी देशासाठी बलिदान करणाऱ्या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करून स्वातंत्र्यासाठी किती कष्ट भोगावे लागले याचे महत्त्व आपल्या मार्गदर्शनीय भाषणातून सांगितले. मुख्याध्यापिका राजश्री राऊत यांनी स्वातंत्र्याबद्दल आपले मत व्यक्त केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय कोचे यांनी तर आभार प्रीती राजस यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्राची श्रीवास्तव, आम्रपाली राऊत, उषा बिसेन ,ज्योती नेवारे , रंगारी परिचर कल्पना खेकरे लिहीनता मडावी लोकेश राऊत योगराज मस्के उमेश कवरे आणि रामटेके ड्रायव्हर यांनी सहकार्य केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles