पेशव्यांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल भालचंद्र नेमाडे यांचा पुण्यात निषेध

पेशव्यांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल भालचंद्र नेमाडे यांचा पुण्यात निषेध



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी

पुणे: ज्येष्ठ साहित्यिक डॉ.भालचंद्र नेमाडे यांनी पेशव्यांबाबत नुकत्याच एका कार्यक्रमात केलेल्या वादग्रस्त विधानामुळे दुखावलेल्या पुणेकरांनी ‘थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठान’ यांच्या वतीने एका निषेध सभेचे आयोजन केले होते. बाजीराव पेशवे, नानासाहेब पेशवे यांच्या नावाने विजयी घोषणा देत,” हिंदू म्हणून जगण्याची अडगळ वाटते का ?” असा प्रश्न करीत भालचंद्र नेमाडे यांचा सभेच्या वतीने धिक्कार करण्यात आला.

याप्रसंगी पेशव्यांच्या वंशज आदिती अत्रे आणि माजी आमदार प्रा.मेधा कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. मेधाताई कुलकर्णी निषेध व्यक्त करताना म्हणाल्या , ‘ नेमाडे आणि त्यांच्यासारखेच काही विचारवंत अशाप्रकारे थोर महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्ये करून समाजातील लोकांची मने बोथट करण्याचे काम करीत आहेत.’

इतिहास अभ्यासक जगन्नाथ लडकत तसेच कुंदनकुमार साठे यांनीही याप्रसंगी आपले विचार मांडले. श्री.लडकत म्हणाले , ‘ अटकेपार भगवा फडकवणाऱ्या पेशव्यांचा पराक्रमी इतिहास नेमाडे यांच्यासारखे ज्येष्ठ साहित्यिक तरुण पिढीपुढे जाणीवपूर्वक विपरीत पध्दतीने मांडत असून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा उद्योग करीत आहेत.’

कुंदनकुमार साठे म्हणाले , ‘ नेमाडे यांनी इतिहासाची मोडतोड करुन चुकीचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न करणे अत्यंत निषेधार्ह आहे. क्रूरकर्मा औरंगजेबाचे उदात्तीकरण आणि पराक्रमी पेशव्यांविषयी आपमानास्पद उद्गार हे नेमाडे यांचे कृत्य अशोभनीय आहे.”

हिंदू महासंघाचे आनंद दवे , परशुराम संघाचे विश्वजित देशपांडे , श्रीकांत नगरकर , चिंतामणी क्षीरसागर , मकरंद माणकीकर , असे विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी या सभेस उपस्थित राहून आपला निषेध तीव्र शब्दात नोंदवला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles