“युवा शक्तीचा उपयोग राष्ट्र निर्मितीसाठी व्हावा”; नरेश शेळके

“युवा शक्तीचा उपयोग राष्ट्र निर्मितीसाठी व्हावा”; नरेश शेळकेपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

आपण आपल्या देशाचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अभिमानाने साजरा करतो आहोत. पण यासाठी असंख्य ग्यात, अज्ञात स्वातंत्र्यवीरांनी आपल्या सर्वस्वाचा त्या केला. अनेकांनी इंग्रजांच्या लाठ्या, काठ्या ,वेळप्रसंगी छातीवर गोळ्या घेतल्या ,फासावर गेले, तुरुंगवास भोगला तेव्हा मोठ्या संघर्षातून देशाला स्वातंत्र्य मिळाले. आपल्या देशाच्या राज्यघटनेने चतुर्णीय व्यवस्था नाकारत सर्वांना एका माळेत गुंफले.

सर्वभौम, समाजवादी धर्मनिरपेक्ष , लोकशाही गणराज यावर आधारित देश घडल्याने आपली प्रगती झाली. स्वतंत्र पूर्वी सुई देखील आयात करणाऱ्या आपल्या देशाने केव्हाचे चंद्रावर पाऊल ठेवले आहे. आपण विविध क्षेत्रात प्रगती करत स्वयंपूर्ण झालो आहोत. आजच्या युवकांनी देखील पूर्व इतिहासाचे स्मरण ठेवत युवाशक्तीचा उपयोग राष्ट्रनिर्मितीसाठी करावा असे मत नरेश शेळके सचिव ,यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र बुलढाणा यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 14 ऑगस्ट रोजी बुलढाणा येथे आयोजित युवा स्वतंत्र ज्योत रॅली प्रसंगी केले.

यशवंतराव चव्हाण सेंटर च्या वतीने महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या संकल्पनेतून स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला युवा स्वतंत्रज्योत रॅलीचे आयोजन स्वतंत्र वीरांचे स्मरण व्हावे व युवकांना देशाप्रती स्वकर्तव्याची जाणीव व्हावी या हेतूने केल्या जाते.

बुलढाणा शहरात देखील गेल्या पंधरा वर्षापासून यशवंतराव चव्हाण सेंटर बुलढाणा जिल्हा केंद्र तथा शिवराय शिक्षण संस्था अंत्री तेली यांच्या वतीने केल्या जाते. जस्तमभ चौक येथून प्रल्हाद काटकर ठाणेदार पोलीस स्टेशन बुलढाणा यांच्या हातून मशाल प्रज्वलित करून युवा स्वतंत्र्या ज्योत रॅलीची सुरुवात करण्यात आली.

शहराच्या मुख्य रस्त्याने भारत माता की जय, स्वातंत्र्य दिन चिराई हो, अशा देशाप्रती घोषणा देत हुतात्मा गोरे स्मारकावरती रॅली आली. हुतात्मा गोरे स्मारकावरती मान्यवरांच्या हातून पुष्पचक्र समर्पित करून हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी प्रास्ताविक भाषणात प्रा.दीपक आमले यांनी कार्यक्रमाची पार्श्वभूमी सांगितली. यावेळेस ठाणेदार प्रल्हाद काटकर, यशवंतराव चव्हाण सेंटरचे युवा विभागाच्या प्रमुख डॉ.गायत्री सावजी, महिला विभागाच्या प्रमुख ज्योतीताई पाटील, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख ह .भ. प. शंकर महाराज, विजयाताई कोळसे, शाहीर डी आर इंगळे, यांनीही आपले विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य अंजली गाढे यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी सभापती, डॉ. प्रभावती चिंचोली, माजी कृषी सभापती लक्ष्मी नरेश शेळके, बीटी जाधव, पी एम जाधव, अनिल बावस्कर, दत्ता काकस, सत्तर कुरेशी, बाळासाहेब यसकर, गोपाळराव देशमुख, राजू गवई, सतीश बर्डे, अंजली मारोडकर,संदीप तायडे, गजानन भिवसंकर, गजानन जगताप, विनोद गवई, प्रा. इंगळे सर, प्रा. रवींद्र गाडेकर, रमेश जगताप, वर्षा जाधव, संदीप बोर्डे , रवी मोरे,यांच्यासह मोठ्या संख्येने विविध क्षेत्रातील नागरिक युवक विद्यार्थी पंतप्रधान सेंटर बुलढाणा जिल्हा केंद्राची तथा शिवराय शिक्षण संस्था अंत्री तेली पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रगीता नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles