शशांक पाखोडे यांना योग्य न्याय मिळावा; कास्ट्राईब शिक्षक संघटना

शशांक पाखोडे यांना योग्य न्याय मिळावा; कास्ट्राईब शिक्षक संघटना



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: शशांक दामोधर पाखोडे यांना जि. प. प्राथमिक शाळा वडेगाव (विरली) येथे दिनांक 24/07/2023 ते 04/08/2023 पर्यंत अध्यापन कार्य करण्याचे नोटीसाद्वारे निर्देश दिले. श्री पाखोडे हे वरीष्ठांच्या आदेशानुसार कार्य करीत असतानाच संदर्भ क्र 4 नुसार उच्च प्राथमिक शाळा वायगांव (घो.) ऐवजी उच्च प्राथमिक शाळा शेडेश्वर येथे अध्यापन कार्य करण्याकरीता जाण्याचे आदेश काढण्यात आले.

एकतर संदर्भ क्र. 2 नुसार त्यांना कार्यमुक्त करण्यात आले नाही. शिक्षक रजेवर असलेल्या शाळेत अध्यापन कार्यासाठी पाठविण्यात आले. या काळात संदर्भ क्र. 4 नुसार आदेश बदलविण्यात आला. हे मनमानी व हेतुपुरस्सरपणे केल्याचे निदर्शनास येत आहे. संदर्भ क्र 1 मधील निकषानुसार केंद्रांतर्गत किंवा लगतच्या केंद्रातील शाळेत नेमणूक करण्याचे आदेश आहेत. मात्र सदर शाळा केंद्रांतर्गत किंवा लगतच्या केंद्रातीलही नाही.

उपरोक्त परिस्थितीवरून मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या दिशानिर्देशांकडे दुर्लक्ष करून श्री शशांक दामोधर पाखोडे यांचेवर अन्याय केल्या जात आहे, ही गंभीर बाब आहे. करिता श्री पाखोडे यांचेवर होत असलेला अन्याय दुर करण्यात यावा अशी विनंती परशराम गोंडाणे, मुख्य संघटन सचिव कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्यतर्फे करण्यात आली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles