दबदबा हवाच..

दबदबा हवाच



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

“खूप झाला आई आता,
त्या मास्तराचा शिष्टाचार..
जेव्हा-तेव्हा करत असतो,
अटींचा भडिमार..
आम्ही लहान म्हणून का गप्प बसायचं..
नियमात त्यांच्या का उगाच फसायचं..
नको तो मास्तर, नको ती शाळा
दुसरीकडे, कुठेतरी शिकेन मी पाढा.”

जीवनात शिष्टाचार हवाच असतो बाळा..
तेव्हाच येते शिस्त, मिळते यशाचा धडा…
जर नसेल दबदबा कुणाचा
अतिरेक होईल मनमानीचा..
मग,कार्य होतील कसे सफल?
प्रयत्न पडतील सारे विफल..!
शिवबावर जिजाऊचा,
सानेगुरुजीवर त्यांच्या आईचा,
होताच की दबदबा..
तेव्हाच घडले थोर पुरुष हे,
मिळाला समाजात रुतबा…
दबदबा हवाच,पण तो असावा आदरयुक्त..
राग,भितीपासून अगदीच विभक्त..
तेव्हाच घडेल सुसंस्कृत पिढी..
जी असेल यशस्वी, व्यसनमुक्त…
आणि हो, बदलणार नाही
मुळीच तुझी शाळा..
त्याच शिस्तबद्धतेत घडणार
तुझ्या बालमनाचा घडा”

वनिता गभणे, आसगाव भंडारा
=======

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles