देव आणि पुतळे..

देव आणि पुतळेपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

पूर्वेला लाली आलेली. गार वारा सुटलेला. झाडांवर पक्ष्यांची किलबिल सुरू झाली. पहाटेची अजान झाली. तिच्या आवाजानं तो उठला. पायात बूट,अंगात टी शर्ट घालून फिरायला निघाला. सकाळची निरव शांतता, शुद्ध हवा मनाला भुरळ घालत होती. रस्त्यात सुरवातीला मस्जिद, पुढे गेल्यावर डाॅ. बाबासाहेबांचा पुतळा, डाव्या हाताला महादेवाचं मंदिर, मंदिरापासून हाकेच्या अंतरावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा ऐटीत उभा होता.
प्रभातीच्या लाल केशरी किरणांनी रस्ता, मंदिर, पुतळे, उजळून निघाले होते. तो मस्जिदजवळ आला. समोर उभे राहून वाकून नमाज पढला. पुढे जाऊन बाबासाहेबांना अभिवादन करून, महादेवाच्या मंदिरात चालू असलेल्या काकड आरतीत तल्लीन झाला. शंकराच्या पिंडीवर फूल वाहून बाहेर पडला. शिवरायांच्या पुतळ्याला फुलांचा हार घालून नतमस्तक झाला.

सोनसळी किरणांनी सारी सृष्टी आणि पुतळा अधिकच तेजस्वी दिसत होते. सकाळी फिरायला जाताना सर्व स्थळांना भक्तिभावाने नमस्कार करणे हा त्याचा शिरस्ताच झाला होता. त्याच्या मनात मस्जिद, मंदिर, जातपात असा कोणताच भेदभाव नव्हता. तो मस्जिदजवळ आला की आजूबाजूचे लोक त्याला मुस्लिम समजत. बाबासाहेबांना अभिवादन करताना बौद्ध समजत. मंदिरात गेल्यावर लोक त्याला हिंदू समजत. ज्याने त्याने त्याला आपापल्या समजुतीप्रमाणे जातीधर्माचा ठरवलं होतं. तो निरागसपणे माणसावर प्रेम करत होता. प्रेमाने बोलत होता. सर्वांना तो आपला वाटत होता.

आजही तो नेहमी प्रमाणे उठला,तयारी करून फिरायला निघाला. का..कुणास ठाऊक आज त्याला अजान, मंदिरातील आरतीचा आवाज वेगळाच वाटत होता. पहाटेचा संधीप्रकाश धूसर होऊन पक्ष्यांची किलबिल मंदावली होती. मधूनच घुबडाचा आवाज सकाळची शांतता भंग करीत होता. लाल केशरी किरणं धुक्यात विरली होती.
तो मस्जिद जवळ आला. तिथं काही माणसं जमा झाली होती. त्यांच्या वेगळ्याच हालचाली चालू होत्या. त्याला आज सगळंच वेगळं जाणवतं होतं. तो उभा राहून नमाज पडणार तेवढ्यात एकच कालवा झाला. लोक लाठ्याकाठ्या घेऊन रस्त्यावर उतरली. हाणामाऱ्या, दगड फेक सुरू झाली. कोण कोणाला मारत आहे कळत नव्हतं. पुतळा आणि मंदिराच्या बाजूनं झुंडी दाखल झाल्या आणि एकच रणधुमाळी माजली. हाडामासाची जिवंत माणसं एकमेकाला भिडली. कुणाच्या तरी चिथावणीने माणूस माणसाला विसरला होता. रस्त्यावर रक्तामासाचा चिखल झाला. तो रक्तबंबाळ होऊन त्या रक्ताळलेल्या मातीत हिरवं,निळं,भगवं रक्त शोधत फिरला. पण लाल रंगाशिवाय त्याला दुसरा रंग दिसला नाही. तो देव आणि पुतळ्यात माणसाचा DNA शोधत राहिला. स्तब्ध, शांत दगड होऊन..!

श्री. पैठणकर के. आर.(प्राथमिक शिक्षक)
आश्रमशाळा डहाळेवाडी
ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles