शिक्षणाची माऊली सावित्रीबाई फुले..

शिक्षणाची माऊली, सावित्रीबाई फुलेपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अज्ञानाच्या अंधःकारात, चाचपडत होती नारी, पिढ्यानपिढ्याच्या जटील, कुटील, परंपरेने लादलेले नियम आणि रितीरिवाजाच्या ओझ्याखाली,ती दबली होती. भावना शून्य जीवन जगताना नाडली पिचली जात होती, अन्याय अत्याचाराने भरडली जात जरी, होती,तरी उफ्फ असा आवाजही काढू शकत नव्हती. जिवंत असूनही मरणयातना भोगणारी शोभेची बाहुली संस्कृती, जोपसणारी आदर्श नारी, आणि, सर्वांच्या गरजा भागवणारी हक्काची चाकर -गुलाम,हीं तिची ओळख होती.

चूल -मूल, यातच गुरफटलेली,नारी जिला स्वतःचे असें कोणतेच अस्तित्व नव्हते. अश्या काळात जोतिबाफुले,या महापुरुषांचा जन्म 11एप्रिल 1827रोजी, गोविंदराव आणि चिमणाबाई या माता पित्याच्या पोटी झाला. लहान असताना त्याचे विचार क्रांतिकारी होते, शिक्षण त्यांच्या पासून कोसो अंतरावर दूर होते. तरीही त्यांनी जिद्द सोडली. पेशव्याच्या दरबारात फुले पोहचवणे काम करता करता मिशनऱ्याच्या शाळेत3री पर्यंत शिक्षण घेतले. हें जेव्हा वर्ण श्रेष्ठीना कळले तेव्हा त्यांचे शिक्षण त्यांच्या वडिलांना धाकात घेऊन, बंद करायला भाग पाडले.

सातारा जिल्ह्यातील खंडोजी नेवसे पाटील यांची मुलगी सावित्रीबाई हिच्याशी 1840साली झाला.जोतिबाचे वय 13वर्ष आणि सावित्रीबाई चे वय 10वर्ष असें होते. घरच्या शेतीतील कामे करता करता,एकदा जोतिबानी एक विचारू का? मी जे सांगेल ते करशील का? असा प्रश्न, सावित्रीबाई ला विचारला.तेव्हा त्यांनी उत्तर दिले, “तुम्ही माझे पति आहात, तुमच्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही,माझी सावली तुम्ही आहात” तेव्हा तू शिक्षण घे, साक्षर हो, मी तुला शिकवीन, आणि मग तू साऱ्या महिलांना शिक्षण दे. आपण दोघेही शिक्षणाचे कार्य करू ‘देशील का मला साथ’!अशी भावनिक हाक सावित्रीच्या आत्म्यास घातली. तेव्हा, हो आनंदाने,घेईल शिक्षण देईल साथ. कारण मी तुमची अर्धांगिनी आहे. या उत्तराने समाधानाचे तेज चेहरा आणि डोळ्यात पाहून दोघेही भरून पावले.

शिक्षण घेणाऱ्या आपल्या मुली असुरक्षित आहेत, एकतर्फी प्रेमातून तिचा बळी जात आहे, केवळ नोकरीं म्हणून तिचा गुलामासारखा वापर होतो, विचार आचाराचे स्वातंत्र्य गमावून अबला झाली आहे,विधवा परीत्यक्ततेवर अजूनही अमानुष अत्याचार होत आहेत. हुंडाबळीची संख्या झपाट्याने वाढत आहे, बालविवाह होत असून, मुलीचा जन्म नाकारला जाऊन तिला गर्भातच मारले जाते. मग, महिलांनो किती गप्प बसणार आहात. उठा जाग्या व्हा. आणि सावित्रीच्या विचार आणि कार्य वाटेवर चालत रहा. स्वतःची जात बाईपण वाचवा, त्यास बहरु,दया, नावा,रूपास येऊ दया, स्वअस्तित्व जपा, स्वाभिमान बाळगा, आत्मविश्वास जगण्यात वागण्यात येऊ द्या. सावित्रीच्या आधुनिक लेकी नातीनों,आपणास सावित्रीबाई फुलेचे अधुरे कार्य पुन्हा पूर्ण करण्याची वेळ आली आहे. म्हणून नव्या जाणींवा वृंधिकृत करूयात. सावित्रीबाईच्या शिक्षणाचा वसा पुढील पिढीला देत राहू.

मायादेवी गायकवाड
मानवत जि.परभणी
======

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles