राजर्षी शाहू महाराज आणि शिक्षण..

राजर्षी शाहू महाराज आणि स्त्री शिक्षण



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

विसाव्या शतकात महाराष्ट्रातील अनेक थोर समाज सुधारकांनी शिक्षणाबद्दल विशेषतः स्त्री शिक्षणाबाबत अनेक विचार मांडले व त्याचबरोबर अनेक शिक्षण संस्था काढून स्त्री शिक्षणाला व दलितांच्या शिक्षणाला चालना दिली. त्यामध्ये महर्षी कर्वे , ज्योतिबा फुले, विठ्ठल रामजी शिंदे व स्त्री शिक्षणाचे कार्य करणाऱ्या सावित्रीबाई फुले इत्यादी समाजसुधारकांचा उल्लेख केला जातो. या सुधारकांप्रमाणे राजर्षी शाहू महाराजांचे कार्य उल्लेखनीय आहे. शिक्षणाशिवाय स्त्रियांची स्थिती सुधारणे शक्य नाही, हे शाहू महाराजांनी ओळखले तेव्हा त्यांनी स्त्री शिक्षण विषयक सुधारणा करण्यास सुरुवात केली.

समाज शिकून शहाणा झाल्याशिवाय त्यांचे दारिद्र्य, अज्ञान ,अंधश्रद्धा नष्ट होणार नाही हे जाणून राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षणाच्या विशेषतः प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारावर भर दिला. प्राथमिक शिक्षण मोफत आणि शक्तीचे करण्याबाबत २१ सप्टेंबर १९१७ ‘सक्तीच्या शिक्षणाचा कायदा’ केला व तो अमलात आणला. प्रत्येक खेड्यात प्राथमिक शाळा सुरू करण्यात आल्या. शाहू महाराजांच्या संस्थानांमध्ये एक लाख रुपये खर्च प्राथमिक शिक्षणासाठी होत असे.कारण पाया पक्का असेल तरच माणसांची भावी शैक्षणिक प्रगती होऊ शकेल असे राजर्षी शाहू महाराजांचे मत होते. ते म्हणत, “शिक्षणाने आमचा तरणोपाय आहे, असे माझे ठाम मत आहे. शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती झाली नाही असे इतिहास सांगतो.” शाहू महाराजांनी केवळ स्त्रियांकरिता शिक्षणाची सोय केली नाही तर स्त्रियांच्या सर्वकष विकास व्हावा यासाठी प्रथम स्त्रियांना शिक्षण देऊन समाजात मानसन्मान, प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यामुळे राजर्षी शाहू महाराजांची एक प्रगतीशील राज्यकर्ता म्हणून त्यांची प्रतिमा निर्माण झाली.

डॉ. प्रा. कल्पना सांगोडे
अर्जुनी/मोर जि.गोंदिया

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles