हिवरकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वाडी येथे “राष्ट्रीय हत्तीरोग मोहीमेचे” आयोजन

हिवरकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वाडी येथे “राष्ट्रीय हत्तीरोग मोहीमेचे” आयोजन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर :- हिवरकर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वाडी नागपूर येथे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत “राष्ट्रीय हत्तीरोग मोहीम” राबविण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रकाश हिवरकर उपस्थित होते. तसेच प्रमुख मार्गदर्शक डॉ. जयश्री त्रिवेणी जिल्हा समन्वय समिती उपस्थित होत्या. डॉ. चारमोडे मॅडम, महल्ले सर व व्याहाड येथील आशा कार्यकर्ता मीरा राजे, यशोधरा गेडाम, शीला वासनिक, निर्मला झंजाळ उपस्थित होत्या. सर्वप्रथम सरस्वती पूजन करुन पाहुण्यांचे स्वागत करण्यातआले. डॉ. जयश्री त्रिवेणी यांनी विद्यार्थ्यांना हत्तीरोग याविषयी मार्गदर्शन केले, व आशा कार्यकर्ता यांनी विद्यार्थ्यांना औषधोपचार दिले.

या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा.राजेश्वरी सांगोलकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन छाया गणवीर यांनी केले. महाविद्यालयांचे प्रा.शुभांगी बनसोड, प्रा. निशा पिसे, प्रा. स्नेहा मेहरे, प्रा. वैशाली बारसागडे, प्रा. जोशना अलोणी, प्रा. अर्चना मनोहरे, प्रा. दिव्या रेवतकर , प्रा.अंकित जगताप उपस्थित होते. हा कार्यक्रम सर्वांच्या सहकार्याने यशस्वीरित्या संपन्न झाला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles