स्कूल ऑफ स्कॉलर्स बेलतरोडी येथे बुद्धिबळ स्पर्धा संपन्न

स्कूल ऑफ स्कॉलर्स बेलतरोडी येथे बुद्धिबळ स्पर्धा संपन्न



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर :- क्रीडा अधिकारी कार्यालय, नागपूर तर्फे आयोजित तालुका स्तरिय शालेय बुद्धिबळ स्पर्धा नुकत्याच स्कूल आँफ स्कॉलर्स बेलतरोडी येथे घेण्यात आली. या तालुकास्तरीय स्पर्धेच्या कार्यक्रमाचे अध्यक्षा संचालिका आभा मेघे मॅडम, स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या प्राचार्या डॉ. उमा भालेराव मॅडम, प्रमुख पाहुणे तालुका संयोजक श्री. उमेश चौरे व श्रीमती स्वाती पाणबुडे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती वंदना विनया मॅडम यांनी सादर केली. प्रास्ताविक डॉ. उमा भालेराव मॅडम यांनी केले. खेळाचे नियम व अटी श्रीमती स्वाती पाणबुडे यांनी खेळाडूला सांगितले. अध्यक्षीय भाषणात आभा मेघे यांनी सरस्वती मातेला 64 कला अवगत होत्या त्याप्रमाणे बुद्धिबळ खेळ खेळतांना 64 घरात गोट्या खेळतांना कौशल्यांचा कस लागतो, व मुलांना शुभेच्छा दिल्या.

विजयी संघांना चषक देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेत 14 वर्ष वयोगटातील मुले यात मोंटफोर्ट स्कूल अशोकवन प्रथम क्रमांक पटकावला तर, व्दितीय क्रमांक सुद्धा मोंटफोर्ट स्कूल यांनी पटकावला,14 वर्ष वयोगटातील मुलीच्या संघात सोमलवार स्कूल कापसी यांनी प्रथम क्रमांक पटकावला व सेंट जोसेफ स्कूल यांनी व्दितीय क्रमांक पटकावला. 17 वर्ष वयोगटात मुलांमध्ये आँस्पायर स्कूल यांनी प्रथम क्रमांक पटकावला व माॅर्डन स्कूल बोखारा यांनी व्दितीय पटकावला. 19 वर्ष वयोगटात मुलांमध्ये प्रथम स्कूल ऑफ स्कॉलर्स स्कूल बेलतरोडी यांनी पटकावला, व व्दितीय क्रमांक दिल्ली पब्लिक स्कूल लावा यांनी पटकावला आहे. 19 वर्ष मुलिंच्या वयोगटात प्रथम व द्वितीय क्रमांक जैन इंटरनॅशनल स्कूल यांनी पटकावला. तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वैदेही मँडम यांनी केले व स्पर्धा यशस्वी होण्यासाठी स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या उपप्राचार्या पुजा मॅडम, निलय वासाडे सर, क्रीडा प्रमुख चारूशिला शेट्टीवार मॅडम, सतीश भालेराव, अक्षय इंगळे, सचिन चौधरी, तन्मय पिंपळे,पंकज मस्के, अरविंद हिवसे,अतुल तांबे व स्कूल ऑफ स्कॉलर्स शाळेचे सर्व शिक्षक व यांच्या सहकार्याने स्पर्धा यशस्वी रित्या पार पडली. विजयी संघाना जिल्ह्यास्तरिय स्पर्धेकरिता शुभेच्छा देण्यात आल्या.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles