दुर्गम भागात खड्ड्यात मरणासन्न अवस्थेत अडकलेल्या बैलाची पशुप्रेमींनी केली सुटका

दुर्गम भागात खड्ड्यात मरणासन्न अवस्थेत अडकलेल्या बैलाची पशुप्रेमींनी केली सुटका



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

रायगड: जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील वाघाव बौध्दवाडी जवळील दुर्गम भागात चिखलात अडकलेल्या मरणासन्न झालेल्या बैलाला माणगाव मधील वन्यजीव अभ्यासकांनी जीवदान दिले आहे.

माणगाव मधील वन्यजीव अभ्यासक शंतनु कुवेसकर व त्यांचे तीन मित्र सचिन वनारसे, परेश मोरे, सागर पाटील हे निसर्गरम्य परिसरात भटकंती करीत होते. म्हसळ्यातील वाघाव बौध्दवाडी जवळील दुर्गम भागातुन कच्च्या रस्त्यावरून आपल्या कारने जात असताना त्यांच्या नजरेस रस्त्यालगत जमिनीवर एका बैलाचे फक्त डोके आणि दोन शिंग हालताना दिसली. हा बैल अनेकतास जीवाच्या आकांताने या निर्मनुष्य ठिकाणी रस्त्यालगत पडल्याने त्याने बाहेर पडण्याचा पुष्कळ प्रयत्न केल्यानेच तो चिखलात आपले शरीर पिळवटून मरणासन्न अवस्थेत गोल वळकटी प्रमाणे निपचीत अडकुन पडला होता. खड्ड्यात मरणासन्न अवस्थेत अडकलेल्या बैलाची पशुप्रेमींनी सुटका केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles