स्वच्छता अभियान, वृक्षारोपण व आरोग्य शिबिराचे आयोजन

स्वच्छता अभियान, वृक्षारोपण व आरोग्य शिबिराचे आयोजनपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: राजीवनगर येथे वाढदिवसा निमित्त स्वच्छता अभियान वृक्षारोपण आरोग्य शिबिर व सत्कार शिबिर कार्यक्रम संपन्न झाला. दरवर्षी प्रमाणे यंदाही किशोर चन्ने यांच्या वाढदिवसानिमित्त हनुमान मंदिर परिसर राजीव नगर वर्धा रोड नागपूर येथे सकाळी 9 पासून स्वच्छता अभियान वृक्षारोपण आरोग्य शिबीर मतदार नोंदणी व सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी मा.नितीन गडकरी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले व त्यांच्या हस्ते सामाजिक व राजकीय कार्यकर्ते किशोर चन्ने यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी किशोर चन्ने यांना व कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या व स्तुत्य कार्यक्रम असल्याचे सांगितले. कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून मा.नितीनजी गडकरी, मा.बंटी कुकडे, प्रकाश भोयर, रमेश दलाल, डॉ. गिरीश चरडे, कमलाकर घाटोळे, विजय भागडीकर, धनंजय कारखानीस, रमेश दलाल, लहू कुमार बेहते, मीनाक्षी तेलगोटे आदी मान्यवर उपस्थित होते सर्वप्रथम किशोरजी चन्ने भाजपा दक्षिण पश्चिममंत्री व भाजपा स्वच्छता अभियान अध्यक्ष संदेशजी कनोजे व नागरिकांच्या नेतृत्वात स्वच्छता करण्यात आली स्वानंद सोनी यांनी वृक्षारोपणासाठी सहभाग दिला व नितीनजी गडकरी, मान्यवर व नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले आरोग्य शिबिरामध्ये बीपी शुगर नेत्र तपासणी दंत तपासणी व जनरल तपासणी करण्यात आली यामध्ये साधारणता दीडशे लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली मतदार नोंदणी फॉर्म चे वाटप करण्यात आले.

प्रशांत चौधरी व टीमने आयुष्यमान भारत योजना आधार कार्ड दुरुस्ती पॅन कार्ड नवीन व दुरुस्ती मॅरेज सर्टिफिकेट जन्माचा दाखला सर्टिफिकेट टू व्हीलर फोर व्हीलर लायसन्स इत्यादी कामाचे शिबिरामध्ये आयोजन करण्यात आले. याचा नागरिकांनी उत्साहात लाभ घेतला. प्रमुख मान्यवरांनी व नागरिकांनी किशोरजींना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व असेच समाजकार्य पुढे निरंतर चालू ठेवण्याच्या मनोकामना व्यक्त केल्या याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सत्कारामध्ये अंजली बेंद्रे, श्रीकांत चितळे, नानाजी टापरे, प्रल्हाद , माधवराव गावंडे, रंजन खेडुलकर, सेवकराम ईटनकर, नेहाल नवखरे, उदाराम साठवणे, बारेदार काका, खोत काका, सतीश काळे इत्यादींचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम प्रसंगी अनेक मान्यवरांनी कार्यक्रमा विषयी आपल्या भावना व्यक्त केल्यात.

याप्रसंगी निखिल भुते, अजय धोपटे, प्रभाकर नवखरे, संजय चन्ने, अतुल चन्ने डॉ.जयश्री चन्ने, दिव्यांश चन्ने, दीपक भोळे, जयपुरकर, प्रफुल लाखे, आदींनी कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता सहकार्य केले. कार्यक्रमात भरपूर प्रमाणात नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन गायकवाड पाटील इंजिनिअरिंग कॉलेजच्या विभाग प्रमुख प्रा.सौ ममता टाकळखेडे यांनी केले. प्रास्ताविक उज्वला भोळे व आभार किशोर चन्ने यांनी मानले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles