शिल्पा संभाजी मारकड-शेंडगे यांचा कळस केंद्रातील शिक्षकांकडून सत्कार

शिल्पा संभाजी मारकड-शेंडगे यांचा कळस केंद्रातील शिक्षकांकडून सत्कारपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रुई येथील विद्यार्थीनीची वर्ग १ अधिकारीपदी निवड

पुणे: राज्यात नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या निकालानुसार शिल्पा संभाजी मारकड-शेंडगे यांचि कृषी उपसंचालक(वर्ग१) पदी निवड झाली. तिचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रुई येथे‌ झाले. मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन तिने यशाला गवसणी घातली. या अभिमानास्पद कामगिरीसाठी दि (१ सप्टे.) रोजी शिक्षण परिषदेचे निमित्त साधून, कळस केंद्रातील शिक्षकांतर्फे तिचा अभिनंदन सोहळा उत्साहात संपन्न झाला.

याप्रसंगी रुई गावच्या सरपंच सौ. कृष्णाबाई कचरे, माजी सरपंच श्री. यशवंत कचरे, उपसरपंच अॅड. सौ. सुप्रिया मारकड, केंद्रप्रमुख श्री.नवनाथ ओमासे, पोलिस पाटील श्री. अजितसिंह पाटील, बाबीर विद्यालयाचे अध्यक्ष श्री.अमरसिंह पाटील, बाबीर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. पाटील सर, शिल्पाचे बंधू अॅड. अमरसिंह मारकड, वडील श्री. संभाजी मारकड, चुलते श्री. सर्जेराव मारकड या मान्यवरांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा संपन्न झाला.

यावेळी तिला शिकवणा-या व सध्या याच केंद्रात कार्यरत असणाऱ्या शिक्षिका श्रीम. स्वाती आटोळे-मराडे यांचाही सत्कार करण्यात आला.
अतिशय हुशार, नम्र व प्रयत्नवादी असणा-या शिल्पाने सत्काराला उत्तर देताना उपस्थितांची मने जिंकून घेतली. प्राथमिक शाळेत तिला शिकवणा-या श्रीम. धुमाळ मॅडम, आटोळे मॅडम, बाबीर विद्यालय रुई येथील सर्व शिक्षक, फलटण कृषी महाविद्यालयातील सर्व मार्गदर्शक शिक्षक यांचा नामोल्लेख करत वडील, चुलते, बंधू ,कुटुंबीय, पती श्री. अभिजीत शेंडगे, सासू-सासरे या सर्वांचे सहकार्य, पाठींबा यांच्या बळावर मी हे यश मिळवले याचा आवर्जून उल्लेख केला.

शिवाय यापुढे काम करत असताना शेतकऱ्यांपर्य़त विविध योजना जोमाने पोहचवत प्रामाणिकपणे काम करेन अशी ग्वाही दिली. ग्रामीण भागात शिक्षण घेत घरीच अभ्यास करून तिने मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. दिपक वाघ व श्री. सचिन वणवे यांनी केले. आभार श्री. मारकड सर यांनी मानले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles