शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना

*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट चौदा🎗🎗🎗*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*☄विषय : कुठं गवसंना☄*
*🍂शनिवार : ०२/ ०९ /२०२३*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*कुठं गवसंना*

मैत्री म्हणजे असतो
हृदयाशी बांधलेला
नाजुकसा वातीचा धागा
जीवाभावानी सांधलेला ॥१॥

पण आताशा कुठं गवसंना
मैत्रीचा तसा अतूट धागा
आयुष्यभर साथीला
भरून काढणारी प्रेमाची जागा ॥२॥

चंद्रासम झिजत राहणारा
अखंड ममतेचा शितल दुवा
कधीही मन न मोडणारा
कुठं गवसंना उजेड देणारा दिवा ॥३॥

खरी मैत्री नशिबानेच मिळते
भोवती गोंडा घोळणारे खूप असते
समईची वात जळतच राहते
अंधुकशा प्रकाशाची वाट दाखवते ॥४॥

*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔸📘🔸➿➿➿➿
*कुठ गवसंना?*

रानात सांडले आकाश
घेवू कसा मी श्वास
मिठीत घेतले वार्‍याला
उन्हाचे वेगळेच कयास

त्या बाभळीच्या पानाआडून
वाकून बघतो एक काटा
कचकन तुटला पायात
रक्ताने भिजल्या वाटा

सुकलेल्या या रानात
कुणी चिटपाखरू दिसेना
फाडून काचोळी बांधली
तरी रक्त काही थांबेना

पडली पाठ उघडी
अलगद फुलपाखरू बसलं
कानात देवून गोड बातमी
मनात खुदकन हसलं

होता निरोप त्याचा
मी छातीशी घेतला पदर
सुसाट निघाली वार्‍यागत
नव्हती वेदनेची कदर

कुठं गवसंना? तो मला
मी झाली कावरीबावरी
गेला तोल कसा माझा
हळूच तो सावरी

*डॉ. संजय भानुदास पाचभाई नागपूर.*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔸📘🔸➿➿➿➿
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.०० पर्यंत पाठवावे. विजेत्यांनी कधीतरी निवडलेली रचना साप्ताहिकासाठी पाठवावी (सूचना काळजीपूर्वक वाचावी. ३१ मार्च रोजी वार्षिक सभासदत्व संपलेल्या सदस्यांनी पुनर्नोंदणी करावी)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿
*कुठं गवसंना?*

ठेवतो आपणच जपून
कामाच्या काही वस्तूंना
शोध शोध शोधले तरी
शोधूनही कुठं गवसंना?

भुरळ पडतेय मनाला
ताळमेळ काही लागेना
पुसटशी मिळे कल्पना
शोधतोय कुठं गवसंना?

स्मरण विस्मरण होतंय
कालपरत्वे धांदलघाईत
बऱ्याचदा जवळ असून
शोधीतोय वेळ दवडीत

ध्यानी मनी नसता पण
अचानक प्रगटतेय म्होरं
काम निभावून निघतंय
उगाच लागे जिवा घोरं

आयुष्याचं असच होतंय
भूतकाळात आठवतांना
पुसटशा पाऊल खुणाही
उपयुक्त होती जगतांना

*✍️बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔸📘🔸➿➿➿➿
*कुठं गवसंना ?*

कविमन माझे गुंफत असते
नितनव्या काव्य रचना….
कधी वास्तववादी तर
कधी फक्त कल्पना….
अलंकारिक भाषा
यमक जुळवून
साध्या शब्दात
व्यक्त करते भावना.
कधी सूर लगेच गवसतो
मज निसर्ग सान्निध्यात नेतो.
सागरी तरंगाचे नाद
निनादतात माझ्या काव्यात..
रेखाटते कधी घनदाट
हिरवे अरण्य मनात..
जाऊन पोहोचते कधी अलगद
राधा कृष्णाच्या गावात..
त्यांच्या सोबत रास करते
आनंदाने न्हाऊन निघते…
असाच सारा आनंदी आनंद
पण कधीतरी माझी लेखणी
ही रूसते.
कुठं गवसंना..? सूर अशी
अवस्था असते.
मग फक्त पुढे तमच दिसते.
कविमन माझे हिरमुसते.
अचानक कोणीतरी हाक देते.
हारु नको वेळ जाईल ही पण
लढ,लढ आयुष्याच्या अंतिम
श्वासा पर्यंत.
उठ आता लावू नको
स्वतःभोवती नकारात्मकतेचे कुंपण..
परत येणार नाही आनंदचे
हातून निसटून गेलेले क्षण…

*सौ.मृदुला कांबळे गोरेगाव-रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🔸📘🔸➿➿➿➿
*कुठं गवसंना?*

“कुठं गवसंना?माणुसकी
शोधूनही कुठं सापडंना ”
“चंद्रावर गेला माणूस
पण पाणी इथं गवसंना?”

“माता भगिनी देशात
सुरक्षित राहताना दिसंना ”
“गोर, गरीब, दलीत यांना
न्याय मिळताना गवसंना ”

“एकाच पक्षात एकनिष्ठ
नेते,पुढारी कुठं गवसंना ”
“मतदाराची मतदानाची
इच्छा आता कुठं दिसंना ”

“शेतकरी,कष्टकरी,कामकरी
मजूर,नोकर ,चाकर हसेना ”
“पगार असूनही नोकर
आनंदात सुखी कुठं दिसेना ”

“आकाशात काळे काळे
पावसाचे ढग कुठं गवसंना?”
“शहरात सिमेंटची झाली घरे
जंगल, झाडी,कुठंच दिसंना?”

*✍️श्री हणमंत गोरे*
*मुपो :घेरडी,ता : सांगोला,जि : सोलापूर*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔸📘🔸➿➿➿➿
*” कुठं गवसंना ? “*

हवरलाय सूर माझ्या
सुंदर या लेखणीचा
दाही दिशा बघतोय
शोधून कुठं सापडेना

मजला सूर गवसले
लिहायला सुरु केले
कल्पना नव्हती येत
वास्तविक मी लिहिले

अल्पावधीतच ते झाले
लिखाण माझे प्रसिद्ध
स्वतंत्र विचार सरणी
यातूनच केले मी सिध्द

मध्यंतरी घात झाला
माझ्यावर मी नाराज
शोधत असतो सूर तो
हरवून बसलो आज..!

किती केलेय प्रयत्न
स्पर्धा ही स्वतःशीच
अचानक त्या सूरांना
शोधून कुठं गवसंना ?

*✍️चंदू डोंगरवार अर्जुनी मोर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह.*
➿➿➿➿🔸📘🔸➿➿➿➿
*कुठं गवसंना ?*

असत्याचे दाट धुके..!!
शोधत आहे मी वाट सत्याची
कुठं गवसंना? बापू ती,
तुझी वाट प्रेम, अहिंसेची
मनात विचारांचे तरंग..!!
शोधत होते मी तुझ्या चक्षुत,
सत्य, अहिंसेचे रंग.. !!
तेवढ्यात, कुणाचा तरी कुणाला
अलगद लागला धक्का,
पलटून दिले त्याला,
त्याने दोन-तीन बुक्का..!!
तुझ्या या देशात बापू,
असे का व्हावे..?
दया, शांती सोडून आम्ही
हिंसेला का घ्यावे..?
छोट्या-छोट्या गोष्टीत,
उसळतो का बरं रक्त..?
कुणीच राहिले नाहीत का
गौतमाचे भक्त..?
समाजमनात भिनत आहे,
द्वेष, हिंसेची नौसेना..!!
सत्य, अहिंसा, प्रेमाचे पुजारी
आता कुठं गवसंना..?
आता कुठं गवसंना..?

*सौ वनिता गभणे*
*आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔸📘🔸➿➿➿➿
*कुठं गवसंना ?*

खरंच आयुष्याचा प्रवास
मला काही उमगेना
दुःखच येते पदरी
सुख कुठं गवसंना
आयुष्याचा हा जीवघेणी खेळ
वाटतो संघर्ष जणू एकटीचा
जेवढा सोडवते तेवढाच वाढतो गुंता
प्रश्न जणू स्वतःला सिद्ध करण्याचा
चंदनासारखं झिजवलं आयुष्य
सुगंधित करण्या दुसऱ्यांचे जीवन
ओंजळ कायम रिती राहिली
कधी कुणी जाणलच नाही मन
जगले का मी माझ्यासाठी
मला मी कुठं गवसंना
आयुष्य हे कोड आहे
सोडवलं तरी काही सुटंना……
तरीपण भूतकाळाची साथ घेत
आज या क्षणाला हात देत
उद्याशी खंबीर लढण्या
समजावते माझ्या मना
मला मी कुठं गवसंना
मला मी कुठं गवसंना…?

*सौ. स्नेहल संजय काळे*
*फलटण सातारा*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔸📘🔸➿➿➿➿
*कुठं गवसना*

हरवला विश्वास
का?मला समजेना
खूप शोधाशोध केली
पण कुठं गवसना?

नातीगोती सांभाळून
धावाधाव प्रसंगात
किंतुपरंतु नसे मनी
सत्यवचन व्यवहारात

वात्सल्याचा तो भाव
सर्वांच्या हो ठायीठायी
आपुलकीच्या भावना
दिस आनंदात जाई

काय घडले अक्रित
झाला माझा काय गुन्हा
सगेसोयरे अंतरले
आठवतो मी पुन्हापुन्हा

विनवणी माझी तुम्हा
ठेवा विश्वासाची कामना
जपुया नाती विश्वासाची
एकमेकांप्रती आदरभावना

*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
मुखेड जिल्हा नांदेड
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔸📘🔸➿➿➿➿
*कुठं गवसंना…?*

देठातल्या कळीचे, मनमोही फूल कसे होते
सुगंध,रंग,मकरंद, कोण त्यात भरून जाते..?

हजार जाती फुले फळे, नाना धान्य कुठले
बीज आधी की वृक्ष, हे कोडे कुणाला सुटले..?

कृमी,किटक,पशू,पक्षी, भूचर,जलचर लक्ष
आसन, वसन, शयन, उदर भरणी कसे दक्ष..?

काळे,गोरे,उंचे,खुजे,नकटे, देखणे पुतळे ऐसे
रंग,रूप,स्वभाव भिन्न, तरीही रक्त लाल कसे.. ?

अणूपासून ब्रम्हांडाचे,चाले कसे दळणवळण
असे कोणत्या शक्तिचे,असेल त्यावर नियंत्रण..?

श्वासरूपाने अविरत चाले, तुझे ह्रदय स्पंदन
हाडा मासाच्या गोळ्याचा, कसा धावे स्यंदन..?

सारे कांही अनुभवूनही, मन चक्षूंना दिसेचना
अद्भूत चैतन्याचे तुला,अस्तित्व कुठं गवसंना..?

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔸📘🔸➿➿➿➿
*कुठं गवसंना ?*

भोवरावाणी गरगर फिरते
सुख दुःखाचे चक्र चालते
शोधु कुठं तुला मन रडते
कुठं गवसंना ?
चालता चालता कसा थांबलास
मला मागे ठेवून पुढे निघालास
शोधु कुठं तुला मन रडते
कुठं गवसंना ?
आयुष्याला दिलास आकार
स्वप्न माझे केलेस साकार
शोधु कुठं तुला मन रडते
कुठं गवसंना ?
देह तुझा आगीच्या झंझावात
खडतर प्रवास माझी सुरुवात
शोधु कुठं तुला मन रडते
कुठं गवसंना ?
गार राखेतून फुलं वेचली
गंगेला ती अर्पण केली
शोधु कुठं तुला मन रडते
कुठं गवसंना?
तुझे स्वरूप लेकरात बघते
वाट पुढची चालत राहते
शोधु कुठं तुला मन रडते
कुठं गवसंना ?

*रंजना ब्राह्मणकर*
*अर्जुनी/मोर, जिल्हा – गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔸📘🔸➿➿➿➿
*कुठं गवसंना?*

मनात दाटला अंधार असा
आशेचा दीप कुठं दिसंना
शोधत फिरतोय साऱ्या जगात
भाव प्रेमाचा कुठं गवसंना

हरपले रस्ते हृदयाकडे जाणारे
भुलले मला वाटसरु ते मना रे
थकलो आता पाय निर्बल जहाले
विसवण्या कुठे मज दिसेना किनारे

माझेच मजला अनोळखी का झाले
नजरेत माझी व्यथा का भरेना
स्वार्थ साधण्या फक्त उरलो जगाचा
व्याकुळ जीव माझा मरता मरेना

जागे केले कधी या झोपलेल्या जगाला
आज माझी अवस्था मी सांगू कुणाला
खंबीर उभा सोसूनी घाव सारे
मीच देतो धीर आज माझीया मनाला

उपेक्षित राहिलो आजवर मी प्रेमाला
रीता झालो वाटून ,हाच माझा गुन्हा
क्षीण झालो व्यवहार पाहून जगाचे
मिटले हे डोळे उघडणार नाही पुन्हा

*पवन श्रीरंगसा कुसुंदल,नांदेड*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔸📘🔸➿➿➿➿
*कुठं गवसंना?*

निरभ्र झालं आकाश
दडी मारली पावसानं
चिंतातूर बळीराजा
या रणरणत्या उन्हानं

भेगाळली भुई पुन्हा
माना टाकल्या पिकानं
हिरवगार शिवार
करपलं उन्हानं

जो तो शोधू लागला
डोळे आभाळा लावून
मेघ कुठं गवसना?
गेला आशा दावून

पावसावरच उभी
आबाद जिंदगानी
नको देऊस रे दगा
डोळ्यात आले पाणी

हात जोडूनि दोन्ही
पावसा विनविते तुला
ये रे लवकर धावूनी
नको दुखावूस बळीला.

*सौ. इंदू मुडे, ब्रम्हपुरी.*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔸📘🔸➿➿➿➿
*कुठं गवसंना?*

कुठं गवसंना माणसातला माणूस
मुखवट्यांची दुनिया सारी
माणुसकीचा रंग फिकुटला
कलियुग ठरतेय भारी

फसवे बोल यांच्या ओठी
तत्वांची गाठोडी माळ्यावरती
व्यवस्थेच्या विरुद्ध जाई त्याची
चिता चढे सरणावरती

ऋतुचक्र बदलले माणसापरी
पाऊस ही पाऊस राहिला नाही
अन कोवळी कळी ते म्हातारी आजी
वासनांधाच्या नजरेतुन सुटत नाही

कुठं गवसंना तो तारणहार हरी
इथे अर्जूनांची लागली रांग
भ्रष्ट सरकार लहरी कारभार
गरिबांनी जायचे कुठे सांग

*सौ. रजनी भागवत*
ऐरोली, ठाणे
*©सदस्या- मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔸📘🔸➿➿➿➿

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖

*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏

➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles