खो-खो स्पर्धेत सरस्वती विद्यालय धोंडगावच्या मुलींचा संघ सुद्धा विजयी

खो-खो स्पर्धेत सरस्वती विद्यालय धोंडगावच्या मुलींचा संघ सुद्धा विजयी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

समुद्रपूर: तालुकास्तरीय शालेय क्रिडा स्पर्धा विद्या विकास महाविद्यालय समुद्रपूर येथील पटांगणात आयोजित करण्यात आल्या आहे. सदर स्पर्धेमध्ये खो-खो या खेळात 17 वर्ष वयोगटाच्या आतील मुलींच्या स्पर्धेमध्ये अंतिम सामना सरस्वती विद्यालय धोंडगाव तालुका समुद्रपूर विरूद्ध शिक्षण महर्षी कृष्णराव झोटिंग पाटील विद्यालय नारायणपूर या शाळेशी झाला या अंतिम सामन्यात सरस्वती विद्यालय धोंडगाव च्या मुलींनी पहिल्या राऊंड मधे 07विरूद्ध 2अशी आघाडी घेतली तर दुसर्‍या राऊंड मधे 7विरूद्ध 3अशी आघाडी घेत शिक्षण महर्षी कृष्णराव झोटिंग पाटील विद्यालय नारायणपूरच्या मुलींचा 10 गुणांच्या फरकाने पराभव केला व खो-खो या खेळामध्ये दरवर्षीप्रमाणे ऊज्वल यशाची परंपरा या वर्षी सुद्धा कायम ठेवली.

विजयी खेळाडूंमध्ये कर्णधार समीक्षा फुलकर,मोहिनी शिंदे,तृप्ती मुनेश्वर, स्नेहा खुडसंगे, ईशा वानकर, वैष्णवी बचाटे, प्रज्ञा गायकवाड, श्रेया सातपुते, समीक्षा मेश्राम, प्रतीक्षा बोंडे, कावेरी बचाटे, प्रणाली बुरचुंडे,तन्वी उमाटे ह्या खेळाडू होत्या . विजय खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय आपले आई-वडील व क्रीडा शिक्षक श्री महेंद्र बुटे आणि मुख्याध्यापक श्री.अतुल देवढे ,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दिले. खेळाडूंच्या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा सौ .रेखा कि.गुजरकर ,उपाध्यक्षा सौ अवंती लो.गुजरकर ,सचिव श्री किशोर न. गुजरकर ,सहसचिव श्री लोकेश कि. गुजरकर ,कोषाध्यक्ष श्री निखिल कि. गुजरकर, शाळा समिती पदाधिकारी प्राध्यापक संदीप झाडे सर यांनी कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles