‘विचारचक्र’ ; कवयित्री स्नेहल

*विचारचक्र*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

मानवी मन अविरत
चालू असते विचारचक्रात
सोडवलं तरी सुटत नाही गुंता
अडकून राहतो कायम चक्रव्यूहात…१
अति विचार पण घातक
ठरती नेहमी जीवनी
नैराश्य , हुंदके, उमाळे
अश्रूंचा पूर वाहे नयनी …..२
जिथे प्रश्न आहे
तिथं उत्तर आहे नक्की
प्रत्येक समस्येचं समाधान आहे
खूणगाठ बांध पक्की …३
अपेक्षांना थोडा घाल आवर
जीवनाचं सुटेल कोडं
समाधानात सुख आहे
मर्म जीवनाचं जाण थोडं ….४
विचारचक्रात सतत राहू
नकोस तू गुंतून
आयुष्य खूप सुंदर आहे
बघ एकदा मनासारखं जगून
मनासारखं जगून……५

*सौ. स्नेहल संजय काळे*
*फलटण सातारा*
*सदस्य मराठीचे शिलेदार समूह*

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles