‘नाते जपतांना’; कवयित्री सविता पाटील

नाते जपतांना…



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

खरं तर मी साधी आहे
लोक म्हणतात नागीण आहे..
तूला निडर हवी ना मी..
म्हणून अशी वाघीण आहे..

कधी मी शांत राहते
प्रेमाचे मग शिंपण करते..
वासनेच्या विषारी नजरांना
काट्यांचे कुंपण घालते..

कधी मला राग येतो
मग मी उंबरठा ओलांडते..
ढाल तलवार बंदूकीनं
अमानुष वेड्यांना गाडते..

कधी अंबा, कधी दुर्गा
दुष्टांसाठी कर्दनकाळ..
उकरून काढते मनातील
साचलेला नात्यांचा गाळ..

नाते जपतांना मात्र मी
मनाला मनात गुंतवते..
निस्वार्थ भाव ठेवून
काळोखातही साथ देते..
काळोखातही साथ देते..

सविता पाटील ठाकरे
सिलवासा,दादरा नगर हवेली
=======

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles