‘कमतरता’; कविवर्य विष्णू संकपाळ

कमतरतापुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

तुझ्या परिचयाचा प्रवास
गेलाय मैत्रीच्या पलिकडे
कळत नकळत थांबलाय
किंचित प्रेमाच्या अलिकडे.. //

इथपर्यंतचा प्रयास होता
सहजसुंदर अगदी सोपा
तुझ्या लाघवी स्वभावाने
बांधला ह्रदयातच खोपा.. //

दिलखुलास संवादाच्या
तुझ्या मृगसरी मनभावन
माझ्या वाळवंटी जीवनाचे
जणू होवू लागले नंदनवन..//

सरली कित्येक दिसांची
माझ्या मनाचीही मरगळ
भिनली आपसूक श्वासात
तुझ्या सहवासाची दरवळ.. //

सखे तूच माझे भावविश्व
आता हळूहळू व्यापलेस
तुझा संजिवन परिसस्पर्श
जगण्याचेच सुवर्ण केलेस..//

जसा दिव्यातच प्रकाश
साधली इतकी समरसता
सून्या सून्या आयुष्यातील
भरू लागलीय कमतरता..//

विष्णू संकपाळ बजाजनगर
छ. संभाजीनगर
=======

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles