‘हंबरडा’; कविवर्य केवलचंद शहारे

हंबरडा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

रात चांदण्यांची
तो अंधूकशा अंधार
समोर लावण्यवती
करी घुंगरांचा झंकार

हळू हळू संथ गतीने
चालायला लागली पुढे
मनोमन ती मनात
गिरवित गाण्याचे धडे

रूप यौवन सुंदर
सिंगार तो परिचा
छम जम तो आवाज
येईल तिच्या पावलांचा

मस्त मी गाढ झोपेत
स्वप्नात रंगलेला
बघत होतो सुंदर नजारे
त्या. लावंण्यवतीच्या लिला

मला आठवलेच नाही
गाईचा गोठा बाजूला
तिथे माझी कपिला गाय
हिंस्त्र पशूने नेले वासराला

हंबरडा फोडू लागली
लगेच मला जाग आली
डोळ्यात अश्रू ठेवून
केवीलवाणी पाहू. लागली

हंबरडा फोडून सांगत होती
” नेले रे माझ्या पिल्याला ”
राहू कुणा सोबत मी
मारले रे माझ्या ममतेला

किती ममता किती माया
तिच्या अश्रूतून दिसायची
हतबल झाली ती गाय
पारखी झाली नेहमीची

केवलचंद शहारे
सौंदड गोंदिया

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles