‘श्रावण’; लेखिका रेखा सोनारे

श्रावणपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

छान सकाळी सकाळी, हिरव्या हिरव्या गवतावर फिरताना, बघतच राहिले. नुकतीच पावसाची सर येऊन गेलेली त्यामुळे गवताला थोडा ओलावाच होता. चालताना ते जांणवायला लागले पायाला गुदगुल्या व्हायला लागल्या. या हिरव्यागार गवतावर छोटे छोटे फुल उमललेले दिसले. बघून श्रावणाची आठवण झाली आणि ‘इंदिरा संत’च्या कवितेतील ओळी एकदम आठवायला लागल्या.

रंगरंगुल्या सानसानुल्या, गवतफुला रे गवतफुला
असा कसा रे मला लागला, सांग तुझा रे तुझा लळा

माळरानावर आपल्याच मस्तीत फुललेले फुल.. त्याला कुणी दावेदार नव्हतंच..!मी माझ्यातच खुश…असा हा निसर्ग आपणास खूप काही देतो.. आपण फक्त घेणे जाणतो देणे नाहीच.या तंद्रीत चालतांना अचानक आठवले अरे हा तर श्रावण… नुकत्याच ग्रीष्माच्या झळा सोसून कासावीस झालेली धरती मृगाच्या पावसाची वाट बघत आषाढ सरी केव्हा बरसतील या आशेने अतिशय उत्कटतेने तळमळत असते.

श्रावणातील हिरवळीचा शालू पांघरून नववधूप्रमाणे माझा राजकुमार केव्हा मला भेटायला येईल आणि बेधुंद होऊन केव्हा मी न्हावून निघेल, या उत्सुकतेत वाट बघतअसते. यावर्षी तर या श्रावणाला अजूनच वेळ मिळाला डबल श्रावण. श्रावण म्हटलं की, सगळीकडे हिरवळच हिरवळ. डोंगरदर्‍यातून वाहणारे ते धबधबे या वातावरणात नटलेला निसर्ग ,उमलणारी रंगीबेरंगी फुले किती सुंदर दृश्य डोळ्यास पडत असते. इंद्रधनुष्यही आपल्या रंगाची नक्षी दाखवायला मागे रहात नाही आणि त्यात सणांची रेलचेल.. म्हणजेच खाण्याची सुद्धा मजाच. एकामागे एक श्रावण सोमवार शिव शंकराची आराधना …नागपंचमीला आलेली माहेरवाशीन लहानपणी झाडाला बांधलेला झुला आणि त्यावर मैत्रिणीसोबत घेतलेला झोका या रम्य आठवणीत रमलेली, मंगळवारी नुकतीच लग्न झालेली वधू मंगळागौरीच्या पूजनासाठी माहेरी आलेली…. राखी पौर्णिमा, गोकुळाष्टमी शेवटी पोळ्याने समाप्ती.. अशी कितीतरी पारंपरिक सणांची मांदियाळी…

आणि मग आठवतो या महिन्यासी जोडलेला निसर्ग या सुंदर निसर्गाचे रूप मनात भरून डोळ्यात साठवून किती बरे याची स्तुती करावी आणि आपण म्हणून याच पर्यावरणाचा ऱ्हास करतो की काय अशी उगीच मनात खंत. श्रावण सोमवारी महादेवाला आवडती अशी बिल्वपत्रे कितीतरी प्रभागात तोडली जातात. किंबहुना एकशे आठ पत्री महादेवावर चढविल्याशिवाय मनाचे समाधान होत नाही.दुसरीकडे तेच मन विचारतं किती त्या झाडाला त्रास देऊन त्याची पाने तोडून तीच देवाला वाहायची.पाच पाने पण आपण वाहू शकतो..आपण फक्त आपल्या धार्मिक भावना जोपासतो मग त्याला उगीच ओरबाडून दुखापत करायची तेही सजीवच ना…!

आपण कुठे पर्यावरण संरक्षण करतोय ? इतकेच नव्हे तर पूजेतील कपडे, सुपाऱ्या, हळकंड हे सुद्धा पाण्यात फेकून देतात .त्यामुळे पाणी दूषित होणारच किंबहुना आजाराला आमंत्रणच.…! वाहत्या पाण्यामध्ये आपण ते फेकलं की तळाशी बसणार काही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहत जाणार काही किनाऱ्याला लागणार ते पाण्यात कुजते त्यामुळे पाणी प्रदूषित होतंय कुठे ते पाणी पिल्या जाते वाहत्या खळखळ पाण्याला वाहू द्या. कुणी खराब झालेला प्रसाद कुठे इकडे तिकडे न पडावा म्हणून तेही पाण्यात टाकतात. विहिरीत, तलावात सुद्धा निर्माण टाकल्या जाते. याला मग आपणच जबाबदार ना…!

गणपती मध्ये निर्माल्य बाजूला गोळा करून मग तेही कचऱ्या मध्ये जाते आणि हा कचरा इकडे तिकडे विखुरलेला दिसतो. हिरवी झाड तोडल्या जातात सिमेंटचे रस्ते म्हणून मोठ्या मोठ्या वृक्षांची कटाई केल्या जाते जंगल तोडीचे प्रमाण सुद्धा वाढलेले आहे असा मानवाकडून होणारा हा सृष्टीचा विध्वंस आपणच उघड्या डोळ्यांनी बघत असतो. माणूसच बदलतो आहे तर आता निसर्ग ही बदलणारच पण आपण याचे जर संगोपन केले तर आपल्याला पृथ्वीवर स्वर्ग उतरला की काय असे भाषेल. बेलपत्री,पानं तोड झाली की पुन्हा वृक्ष नव्याने बहरणार, चैतन्यमय होणार पण झालेल्या निर्माल्याचे काय? हा प्रश्न आपण घरच्या घरी सोडू शकतो.

गोळा करुनी निर्माल्य, करू या खत निर्मिती
नच टाकता नदीत, द्यावी मातीत आहुती

जर आपण त्याचे घरीच कंपोस्ट बनविले, तर प्रदूषण पण होणार नाही आणि घरीच खत बनवून आपण पुन्हा नवनिर्मिती घडवू शकतो आणि आपल्या धार्मिक भावना पण जोपासू शकतो म्हणजे आपली दुहेरी भूमिका साध्य होईल निर्माल्य नदीत, तलाव, विहीर मध्ये न टाकता घरीच कंपोस्ट बनवून प्रदूषणास आळा बसेल आणि सुंदर बाग निर्मितीसाठी खत मिळेल. नवचैतन्य बघून आपल्यालाही आनंद मिळेल.

रेखा सोनारे, नागपूर

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles