‘चाणक्य’; लेखिका कुसुमलता वाकडे

चाणक्य भाग १पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

चाणक्याचा आयुष्याबद्दल अनेक दंत कथा आहेत. चाणक्य हा सम्राट चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात प्रधान मंत्री होता .चंद्रगुप्ताच्या राज्यापूर्वी नंद घराण्याची सत्ता होती. ती सत्ता उलथुन चंद्रगुप्ताला राज्यावर बसवण्यात चाणक्याचा मुख्य हात होता. चाणक्य हा पाटलीपुत्र नगरातल्या चणक या शिक्षकाचा मुलगा होता. नंद राजवटीच्या विरोधात बोलल्यामुळे चणकला तुरूंगात टाकण्यात आलं आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. चणकाच्या मृत्यूनंतरही नंद राजवटीच्या लोकांनी चणकाच्या कुटुंबातील लोकांना जगणं असह्य करून सोडलं. त्यामुळे चाणक्याला पाटलीपुत्र सोडून तक्षशिला इथं जाव लागलं. तक्षशिला विद्यापीठात त्यानं आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि तिथेच राजनीती आणि अर्थशास्त्र हे विषय शिकवायला सुरूवात केली.

त्या काळात चाणक्याचं नाव खूप आदरपूर्वक घेतले जात असे. चाणक्य इतकं सुरेख शिकवत असे की त्याच्या मार्गदर्शनाखाली अनेक राज्यांचे मंत्री तयार झालेत. दुस-या एका कथेप्रमाणे चाणक्य मगध साम्राज्यात विद्यालयाच्या परिसरात आपलं गुरूकुल चालवत असे. त्याची ख्याती सर्वत्र पसरल्यामुळे दूरदूरून विद्यार्थी त्याच्याकडे शिकायला येत. मगधावर त्या काळी नंद राजाची सत्ता होती. नंद हा अतिशय जुलमी आणि कपटी राजा होता. त्याचा मुख्यमंत्री विक्टर याच्या आई वडीलांना आणि इतर नातेवाईकांना नंदराजानं काही कारणास्तव तुरूंगात डांबून त्यांचा अतोनात छळ करून त्यांना ठार मारलं होतं. विक्टरला नंद राजाचा सूड घ्यायचा होता. एके दिवशी नगरातून फिरत असताना भर उन्हात विक्टरला एक अत्यंत कुरूप मनुष्य जमिनीतल्या हरळीच्या मुळ्या उपटून काढताना दिसला. विक्टरनं त्याला तो काय करतोय असं विचारल्यावर त्या माणसानं ‘मी माझ्या पायाला जखमा करणा-या या हरळीचा नाश करायचं ठरवलं आहे ‘असं सांगितलं हाच मनुष्य नंद राजाचा सूड घेण्याकरीता योग्य आहे असं विक्टरला वाटलं आणि त्यानं त्या मनुष्याला आपल्याबरोबर आपल्या वडिलाचं श्राध्द करण्यासाठी यावं अशी विनंती केली. या मनुष्याचं नाव होतं चाणक्य !

योग्य वेळी विक्टरनं चाणक्याला नंदराजापुढे उभं केलं. त्यावेळी त्याचं कुरूप रूप बघून नंदराजा कडाडला , ‘ अरे हा ब्राम्हण आहे की चांडाळ ? याला माझ्यापासुन दूर करा.’ त्याच्या या शब्दांनी चाणक्य खूपच अपमानित झाला आणि त्यानं या अपमानाचा बदला घेण्यासाठी, ‘आपल्या शेंडीची गाठ सोडली आणि नंदराजाचा नाश केल्यावरच ही गाठ बांधायची प्रतिज्ञा केली.’

कुसुम दिलीप वाकडे
दिघोरी, नागपूर

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles