‘नटखट कान्हा’; कवयित्री कुसुम पाटील

नटखट कान्हा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

दहीहंडी रचितो कान्हा
सवंगड्यांची साथ त्याला
यशोदा देवकीचा कान्हा
आज दंग ग गोपाळकाला

गोविंदा आला रे गोविंदा आला
दहीहंडीचा कलश ग फोडला
थरावर थर थरारक चढवून
चिंब भिजुनी गोपाळ दंगला

नटखट लाल नंदकिशोर
दहीहंडी फोडण्यास सरसावला
गोकुळात गोप गोपिका
मथुरेच्या बाजारी आल्या

दह्या दुधाची आवड ग कान्हा
नटखट बाळकृष्ण मुरारी
कृष्ण लीला आनंदाचा सोहळा
आवडीने वाजवी बासरी

समाजातील विषमतेची हंडी
आज द्वेष अहंकराची फुटावी
एकमेकाच्या जीवाभावाची
संस्कृती सत्कर्माची असावी

कुसुम पाटील
कसबा बावडा कोल्हापूर

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles