‘हंबरडा’; कविवर्य बळवंत डावकरे

हंबरडा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अडाणी जरी माय त्याची
व्यावहारिकता तिच्या ठायी
बऱ्यावाईटांची जाण तिला
घडला तो तिचीच पुण्याई

देशाभिमान मनात तिच्या
काळ सोसला पारतंत्र्याचा
घडविन पुत्र भूमातेसाठी
निश्चय केला देशसेवेचा

स्वप्न तिचे उरी धरोनी
तो पण झपाटला जिद्दीने
साकार केले ध्येयं आईचे
अंग भिजले आनंदाश्रूने

भारतमातेची सेवा सीमेवर
दहशतवाद्यांचे डाव उधळले
गनिमाने झाडली गोळी
अचानक अक्रित हे घडले

शूर जवान शहीद झाला
हंबरडा फोडला वीरमातेने
वीर जवान अमर रहे गजर
आसमंत एकवटला आक्रोशाने

बळवंत शेषेराव डावकरे

मुखेड जिल्हा नांदेड

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles