राष्ट्राला सक्षम करण्याचे श्रेय शिक्षकांचे”; राजेश उपासनी

“राष्ट्राला सक्षम करण्याचे श्रेय शिक्षकांचे”; राजेश उपासनी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_ज्ञानसाधना बहुउद्देशीय विकास संस्थेच्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण_

अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी

नाशिक: “मानवी विकासात शिक्षकांची भूमिका महत्वाची असून, शिक्षक हेच खरे राष्ट्रनिर्माते आहेत. येणारी पिढी संस्कारीत करणे म्हणजेच, राष्ट्राचे भवितव्य सक्षम करणे, हे कार्य करण्याचे सर्व श्रेय शिक्षकांचे आहे. म्हणून समाजाने शिक्षकांच्या प्रती आदरभाव व्यक्त करून गुणवंत शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहीले पाहिजे” असे मत प्रसिद्ध उद्योगपती मा. श्री.राजेश उपासनी यांनी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख अतिथी बोलताना व्यक्त केले. ‘ज्ञानसाधना बहुउद्देशीय विकास संस्थे’ च्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

वसंतराव नाईक शैक्षणिक संकुल येथे नुकत्याच संपन्न झालेल्या एका हृद्य सोहळ्यात गुणवंत शिक्षकांचा मान्यवरांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र, शाल व पुष्पगुच्छ असे सत्काराचे स्वरूप होते. यामध्ये प्रा. डाॅ.श्री. भूषण भालेराव व प्रा.डॉ. दत्तात्रय घुंगार्डे यांच्यासह राज्यभरातील निवडक प्राध्यापक व आध्यपकाचा गौरव करण्यात आला. विशेष म्हणजे, या शिक्षक गुणगौरव समारंभात राज्यातील अ़ंध व विकलांग शिक्षकांचा सुध्दा आवर्जुन समावेश करण्यात आला होता.

याप्रसंगी शासनाच्या वित्त विभागाचे लेखाधिकारी तथा जनकल्याण रक्तपेढीचे संचालक श्र. गजानन देवचक्के यांनी पुरस्कार प्राप्त सत्कारमूर्ती शिक्षकांचे अभिनंदन करून ” रक्तदानाचे महत्व व गरज” या विषयाची माहिती उपस्थितांना दिली. श्री.देवचक्के यांनी स्वतः १०५ वेळा रक्तदान करुन एक आदर्श घालून दिला आहे. निर्मला घोडेराव, संदिप पांडे, मेघा भामरे यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने संस्थेला देणगी रक्कमेचा धनादेश सुपूर्त करून प्रत्यक्ष कृतीने आपली सामाजिक जाणीव व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्तविक व प्रमुख पाहुण्याचा परिचय संस्थेचे अध्यक्ष श्री.राजाराम गायकवाड यांनी करून दिला. सूत्रसंचलन प्रा. अमोल अहिरे यांनी केले, सत्कारार्थींचा परिचय प्रा. संतोष अग्नीहोत्री, प्रा. अनिल भंडारे व महेश शुक्ल यांनी करून दिला. तर सचिव श्री.प्रदीप जगताप यांनी निमंत्रितांचे आभार मानले.

कार्यक्रमाचे संयोजन जयश्री उपासनी, कल्पना भामरे, निर्मला अहिरे, मोना हेमराजानी यांनी केले, तर पुरस्कार्थींची निवड, संस्थेच्या पदाधिकारी निवड समितीचे सदस्य, अजीत कुलकर्णी, सतिश जोशी, सुमंत महाजन, संदिप पवार, सरोज भानुशाली, समाधान जाधव, अर्चना बोकेफोडे, अजय जाधव, नितीन हंडे यांनी केली.

ज्ञानसाधना बहुउद्देशीय विकास संस्थेतर्फे गेल्या पाच वर्षांपासून शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles