बकरीचा फॅशन शो’ ठरला राज्याचा अभूतपूर्व शो

‘बकरीचा फॅशन शो’ ठरला राज्याचा अभूतपूर्व शोपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अकोला: मोठ्या शहरात अनेक फॅशन शो आपण पहिले असतील. पण अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये चक्क ‘बकरीचा फॅशन शो’ आयोजित करण्यात आला होता….. या ‘फैशन शो’मध्ये ‘मोडेल बकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. ‘जोरदार’ अन ‘झकास’ ‘रैम्प वॉक’ही झालाय अन हजारोंच्या बक्षिसांची लयलूटही…. बरं, ‘फैशन’सोबतच या ‘शो’मध्ये सामाजिक भानसुद्धा जपल्या गेलेय. कसा असेल हा फैशन शो?…खरंच, शेतात आणि रस्त्यावर चालणाऱ्या बकऱ्यांचा रॅम्प वॉक’ कसा झाला असेल?, अशा असंख्य प्रश्नांचे काहूर तुमच्या डोक्यात उठले असेल ना… तर चल जाऊयात या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी थेट अकोला जिल्ह्यातील अकोट येथील बकऱ्यांच्या फैशन शो’मध्ये….

‘मी कशाला आरश्यात पाहू ग’.. मी कशाला बंधनात राहू ग… मीच माझ्या रूपाची राणी ग… असं गाणं म्हणत, अकोल्यातील अकोट येथे बकऱ्या सजून धजून ठुमकत ठुमकत रॅम्प वॉक करत होत्या, अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये लोकांच्या ओठी एकच प्रतिक्रिया सहज उमटत होती., ‘काय मस्त सजवल्या बकऱ्या !’ ….’काय सुंदर दिसतायेत हो बकऱ्या’…

निमित्त होत अकोटच्या ‘जे.सी.आय.’ या संस्थेने आयोजित केलेल्या ‘ बकऱ्यांच्या फैशन शो’चे…. .ही दृश्य जरा बघा… शेतात आणि रस्त्यावर दिसणाऱ्या ह्या बकऱ्यांचा हा ‘रैम्प वॉक’ बघा… सजून-नटून-थटून, आलेले हे ‘मॉडेल्स बकऱ्या’… अकोट येथील जे.सी.आय.’ अर्थातच ‘जुनिअर चेम्बर्स इंटरनेशनल; ही संस्था प्रसिद्ध आहेय ती त्यांच्या दरवर्षीच्या आगळ्या-वेगळ्या अन ‘हटके’ ‘फैशन शो’ साठी. याआधी या संस्थेने अकोट येथे गाय, म्हैस, बैल, कुत्रा, ऑटो, बैल-गाडी, ट्रॅक्टर अशा कृषी संस्कृतीशी नाते सांगणाऱ्या घटकांचे ‘फैशन शो’ आयोजित केलेत…. आजचा ‘ बकऱ्यांचा फॅशन शो’ त्यांच्या याच वेगळेपणाची जाणीव करून देणारा आहे….. पारम्पारिक शेतीसोबतच शेतकरी जोडधंदा म्हणून बकऱ्यांच पालन करतात, या बकऱ्यांच दूध औषधी गुणधर्माच सुद्धा आहे. शेतकरी वर्षभर आपल शेत-शिवार फुलविण्यासाठी राब-राब राबत असतोय. मात्र एखादावेळी शेतीत नुकसान झालं तर हीच बकरी त्याच्या उपयोगी ठरते, बकरी शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि सुबत्ता प्राप्त करून देणारी असते. म्हणूनच आजचा हा आगळा-वेगळा फैशन शो म्हणजे बकऱ्यांच्या समर्पणाला केलेला सलाम असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे.

महानगरातील कॉर्पोरेट क्षेत्रातील लोकांच्या संस्कृतीचं दर्शन घडवणारा उत्सव म्हणजे फैशन शो…. संगीत, झगमगाट, रैम्प वर चालणाऱ्या सुंदर मॉडेल्स असं सर्व काही येथे या फैशन शो मध्ये पाहायला मिळत असतंय. कॉर्पोरेट क्षेत्रातील तथाकथित ‘इलाईट क्लास’ या फैशन शो’ संस्कृतीचा पालक… पण, अकोट येथील आजच्या ‘फैशन शो’ मध्ये ‘फैशन’सोबतच कृषी संस्कृतीचे महत्व सांगण्यात आले. अन, याच ‘शो’मधून अनेक सामाजिक संदेश देत देत आपली सामाजिक बांधिलकी अन सामाजिक ऋण फेडण्याचा प्रयत्नही करण्यात आला.

आजच्या फैशन ‘शो’मध्ये बकरीच्या दुधाचे महत्त्व, बकरी पासून बरे होणारे आजार, बकरी पासून होणारे फायदे, यासोबतच इतर सामाजिक संदेश देण्यात आलेत. ‘फैशन शो’ ही ‘कार्पोरेट’ जगतातील संकल्पना… त्यामुळे अकोट सारख्या ग्रामीण अन आडवळणाच्या गावात ‘फैशन शो’ असतो तरी कसा?, याचं मोठं कुतूहल… पण ‘मेट्रो सिटी’ने जपलेल्या ‘फैशन शो’पेक्षा आपल्या संस्कृती, शेतकरी, भूतदयेच्या शिकवणीसोबतच सामाजिक भान जपणाऱ्या या ‘फैशन शो’ने अकोटकरांच्या मनात ‘फैशन शो’ संकल्पनेबद्दल एक आदराची भावना निर्माण केली आहे. या शो मध्ये 51 बकऱ्यांनी सहभाग नोंदविला.

*प्रवीण बनसोड, प्रोजेक्ट डायरेक्टर, जे.सी.आय., अकोट.*

अलीकडे फैशन शो नावाखाली आपल्या संस्कृतीचं हिडीस आणि ओंगळवाणं प्रदर्शन मांडलं जात. मात्र भूतदयेबरोबर संस्कृती आणि विचारांची पेरणी करणारा अकोट मधील बकरीचा फैशन शो म्हणजे सर्वार्थाने वेगळा म्हणावा लागेल.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles