‘कसे थांबेल हे ‘गळफास’रुपी कालचक्र..?; सविता पाटील ठाकरे

‘कसे थांबेल हे ‘गळफास’रुपी कालचक्र..?; सविता पाटील ठाकरेपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे परीक्षण_

“भाऊराव,साबरमती आश्रमात मला जे जमलं नाही ते तुम्ही या ठिकाणी यशस्वीरित्या करून दाखवलं आहे,तुमच्या कार्यास माझा आशीर्वाद.” महात्मा गांधीजींचे हे गौरवोद्गार रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांना उद्देशून होते. जे भाऊरावांच्या कार्याची उंची समजण्यासाठी पुरेसे आहेत. दलित,उपेक्षित, अनाथ, बालगुन्हेगार अशा अनेकांच्या जीवनात शिक्षणरूपी तेजशलाका घेऊन जाण्याचे श्रेय कर्मवीर भाऊराव पाटलांना जाते.

आज प्रकर्षाने मला याची आठवण यासाठी होते की हल्ली खूप वेळा मी हेच ऐकते….. आज या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. आज त्याने गळफास घेतला. त्या विद्यार्थ्याने विषारी औषध पिवून आत्महत्या केली. आज महाराष्ट्रासह देशभरात शिक्षणाचा आणि उच्च शिक्षणाचा निव्वळ बाजार झाला आहे. कॉलेज फक्त नावालाच…. हजारो कोटीचा धंदा करणारे क्लासेस आणि त्यांना खास सपोर्ट करणारी आमची पट्टी बांधलेली शिक्षण व्यवस्था. कधी बदलणार हे चित्र… अरे कधीतरी विचार केलाय का त्या मुलामुलींचा???की बैलाच्या खांद्यावर ‘जू’ ठेवतात तसं तुमच्या अपेक्षांचं ओझं ठेवून मोकळे झालात?? परीक्षेचा तणाव,जीवघेणी स्पर्धा आणि पालकांच्या अवाजवी अपेक्षा या साऱ्या ओझ्याखाली विद्यार्थी परीक्षांना सामोरे जातात .

आत्मविश्वास हरवून टाकणाऱ्या परीक्षांमुळे मुलं निराश होतात.सरासरी रोज ३५ विद्यार्थी या देशात आत्महत्या करतात. यापेक्षा अजून कोणते दुर्दैव असू शकते आपले?
दरवर्षी राजस्थानमधील कोटा शहरात नीट या परीक्षेसाठीचा बाजार भरतो. गेल्या सहा महिन्यात २२ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. तिथे गावाकडे महाविद्यालय प्रवेश आणि मुलगा मात्र कोटाला.. किती किती?वाभाडे काढणार आहोत आपल्या शिक्षण व्यवस्थेचे?? अरे गेल्या दहा वर्षात दहा हजार विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. ही शिक्षण व्यवस्थाच नापास झाल्याचे दिसून येते. कोण रोखणार हे सर्व?? धुंदीतले राजकारणी, मस्तवाल शिक्षण सम्राट ,निर्ढावलेले अधिकारी कि स्पर्धेत उतरून बेधुंद झालेला पालक वर्ग?

जागे व्हा….जागे व्हा आता तरी. शिक्षणाचा बाजार मांडणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आलेली आहे . सोबतच शेतकरी आत्महत्या हा पण विषय खूप गंभीर आला आहे.मी नुकतेच वाचले. “शेती केली होळी केली, कर्जातून मी या धरतीला कंगण साडी चोळी केली. आणि आता असं झालंय की, राख उचलली त्यांनी माझी अन् बंदुकीची गोळी केली.” औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यातल्या बाहेगावात राहणारे शेतकरी, भगवान जाधव यांनी आत्महत्या केली. त्यांची कन्या प्रतीक्षाचे हे उद्गार… मनाला उद्विग्न करणारे आहेत. ती म्हणते“आम्ही शेतकऱ्याची लेकरं घरातल्या दोऱ्या लपवून ठेवतो. तर कशासाठी की बापानं आत्महत्या करू नये. पण आमच्या बापानं गळ्यातल्या उपरण्यानं आत्महत्या केली, आता याच्यापुढे बोलावं तरी काय?” कसे थांबेल हे गळफास रुपी कालचक्र..??

अर्थात समाजाची भूमिका खूप महत्त्वाची आहे. समाज प्रबोधन खूप गरजेचे आहे. तेव्हाच, ‘मराठीचे शिलेदार’ समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी सामाजिक जबाबदारीचे भान मनात ठेवून समाज प्रबोधनाच्या निमित्ताने आजच्या ‘बुधवारीय काव्यरत्न’ स्पर्धेसाठी ‘गळफास’ हा विषय देऊन आपल्या लेखणीस वास्तव लिहण्याची संधी उपलब्ध करून दिली. सर्वांनी विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न केला..तुम्हा सर्व सारस्वतांचे अभिनंदन व शुभेच्छाही..

*पण थोडे काही….*

काल्पनिकता टाळली गेलेल्या लेखनाला वास्तववादी लेखन असे म्हणतात. बहुतांशवेळा असे लेखन स्वतःच्या किंवा इतरांच्या साधार संदर्भासहित स्वानुभवावर अवलंबून असणे अपेक्षित असते. वास्तववादी लिखाण हे प्राप्त परिस्थितीत वज्रमूठ म्हणून काम करते. पण हल्ली याचा अभाव आहे. मी एकच सांगू इच्छिते की चला आपण साहस करूयात खरे ते मांडण्याचे. हो मला मान्य आहे काही लोक दुखावतील, काहींना नाही पटणार आपले विचार…असू द्या..असेही आपल्याला लोक म्हणतातच ना.. ‘जे न देखे रवी ते देखे कवी…’ तेव्हा माझ्यासारखं तुम्हीही धाडस करा..स्पष्ट व वास्तववादी लिहिण्याचे…!!!

सविता पाटील ठाकरे, सिलवासा
मुख्य परीक्षक, प्रशासक, लेखिका, कवयित्री

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles