बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना

*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ कविता स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*🥀विषय : गळफास🥀*
*🍂बुधवार : १३/ सप्टेंबर /२०२३*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*गळफास*

संकटाचं काही नेम नाही
कधी अस्मानी,सुलतानी
उगाच का करून घ्यावी
आपण जीविताची हानी

निसर्गाच्या प्रकोपामुळं
जगणं झालंया अवघड
ओला, कोरडा दुष्काळ
कर्जाचा डोंगर डोईजड

छोटी मोठी संकटे जरी
आयुष्यात येत राहतील
सामना करायचं बळ ही
अनुभवाने देत जातील

उगाच का लावून घ्यावा
आपल्याचं जिवाला घोर
गळफास गळ्या लावून
पोरकं होतं घरदार,पोर

संकटांची शृंखला जणू
सामना करावा लागतंय
हसत खेळत संकटांना
म्होरं तोंड द्याचं असतंय

*✍️बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🍃🌸🍃♾️♾️♾️♾️
*गळफास*

हतबल परिस्थितीपुढे
असह्य झाल्या वेदना
जगाच्या पोशिंद्याप्रति
जागवूया संवेदना

कष्टाची उर्मी तयाची
नेटका प्रपंच त्याचा
सुखी जीवन जगतसे
भार वाहे कुटुंबाचा

अडाणी जरी तो असे
महत्व शिक्षणाचे जाणतो
चिमुकल्यांच्या शाळेसाठी
ऋण सावकारी काढतो

लेक उपवर घरी पाहतो
चिंता मनी सतावते
कसं नि काय करु मी
दिवसा चांदणे दिसते

निसर्गराजा साथ दे तू
नको अंत पाहू माझा
दूर कर दारिद्र्य हे
आशीर्वाद असू दे तुझा

मार्ग दिसे ना कोणता
परिस्थितीपुढे लाचार
गळफास लावून गळा
केले हे जीवनपार

*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
मुखेड जिल्हा नांदेड
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🍃🌸🍃♾️♾️♾️♾️
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध १०२ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे. कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.०० पर्यंत पाठवावे. विजेत्यांनी कधीतरी निवडलेली रचना साप्ताहिकासाठी पाठवावी (सूचना काळजीपूर्वक वाचावी. ३१ मार्च रोजी वार्षिक सभासदत्व संपलेल्या सदस्यांनी पुनर्नोंदणी करावी)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿
*गळफास*

तुझा एक सहवास मज उधारीत दे तू
तुझे एक स्मित हास्य माघारीत दे तू

तुझ्या शराबी डोळ्यात धुंद होऊ दे मला
नकार देण्यास एक पुरावा आधारित दे तू

नको आता दुरावा नकोच विरहात वेदना
फक्त एकतरी स्वप्न तुझ्या आधारित दे तू

जग झोपले असेल ये तू हळूच दारी
एक आश्चर्याचा धक्का पधारित दे तू

दोन्ही हातांनी गळफास जरी मागून आवळला
एक चुंबन ओठांचे मधाळीत दे तू

*डॉ. संजय भानुदास पाचभाई नागपूर.*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🍃🌸🍃♾️♾️♾️♾️
*” गळफास “*

होत्याचे नव्हते होते
मनाचीही तुटते आस
सुचेनासे होतंय तेव्हा
घ्यावा लागतो गळफास

आपलेच होतात पराये
पराया बदलतो रस्ता
गळफास घेण्याचे साधन
दोरखंड वाटतोय सस्ता

जन्माला येतात सारे
वेगवेगळ्या परिस्थितीत
संकटांची रांग लागते
काळोखमय त्या स्थितीत

कारण निमित्त बरेच
असतात हो संकटकाळी
वयाचेही बंधन नाही
गळफास घेण्याच्यावेळी

तेजोमय रविकिरणास
मेघराजा कसा झाकतोय
नैराश्याच्या चक्रव्यूहात
आशावादी असा वागतोय

हसते खेळते जीवन
क्षणात उध्वस्त होतंय
गळफास घेण्याचे कारण
जेव्हा जेव्हा लक्षात येतंय

बरेचसे मेलेत बिचारे
ज्यांनी कुणाचे ना ऐकले
बुद्धीवान हैराण झालेत
मेंदूवरचे का नियंत्रण सुटले..?

*✍️चंदू डोंगरवार अर्जुनी मोर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह.*
♾️♾️♾️♾️🍃🌸🍃♾️♾️♾️♾️
*गळफास*

कधी ना कधी येई क्षण
कठोर श्रम साफल्याचा
नकोस बळी होवू मित्रा
तात्पुरत्याच वैफल्याचा.. //

मान्य आहे तुझ्यावरचा
जरी प्रसंग आहे बाका
म्हणूनच का हा निर्णय
गळफास घेऊन टाका.. //

आधाराच्या खांबानेच
जर का असे डगमगावे
तुझ्या शिवाय घराच्या
भिंतीने कसे उभे रहावे.. //

झटकून सारी विवशता
कर थोडे आत्मपरीक्षण
शोधला तर सापडे मार्ग
होईल सारेच चिंताहरण.. //

पाहता जगात डोकावून
दिसेल दुःख खूप मोठे
पटेल खात्री तेथेच तुला
याहूनही तुझे किती छोटे.. //

राव असो की रंक जरी
कुणी ना येथे सर्व सुखी
काळ सर्वाची दवा असे
कुणी नसे कायम दुःखी.. //

असेल जोवर देही श्वास
संकटांना द्यावी टक्कर
प्रश्न कितीही असो मोठे
गळफास त्याचे नसे उत्तर.. //

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🍃🌸🍃♾️♾️♾️♾️
*गळफास*

पाणी ना शेताला
पिक नाही या घडीला
का घेतो बळीराजा तूं
फास लावून गळ्याला ॥१॥

गळा आवळुन घेणं
हा नव्हे कांही मार्ग
संकटाचा भडीमार
थोपवून करू स्वर्ग ॥२॥

खिशात नाही दमडी
म्हणून फास नको गळी
नको गळफासाची कुबडी
घेऊ नको जीवाचा बळी ॥३॥

डोईवर कर्जाचा बोजा
ओझ्या खाली दबून
करू नको तूं गाजावाजा
कर तूं बुध्दी शाबूत ठेवून ॥४॥

ठेव पावसावर भरवसा
दोष देऊन नशिबाला
कशाला टांगतोस
गळफासाने स्वत:ला ॥५॥

मदत माग सरकारला
मिळाली हुलकावणी
तर,बळ ठेव लढायला
कर पावसाची आळवणी ॥६॥

*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🍃🌸🍃♾️♾️♾️♾️
*गळफास*

काळजाचा तुकडा
होता सद्गुणांची मोहोर
सर्वांचा होवून राही…..
दुःख नाही आनंद देणार

नियतीचा घाला की
तुझ्या मनाचा खेळ
ना कधी उमगली मनातील सल
ना लागला संवादाचा मेळ

क्षणात हरवून बसलास
कसे रे तुझे कमजोर मन
भावना विवश होत्या तुझ्या
बोलून दाखवायचे ना काही क्षण

ना समजले कुटुंबाचे महत्व
तू संपलास समस्या घेवून
परिवाराला शिक्षा दिलीस….
कुठं रे होतं तुझं आत्मभान

बापाचा घाम नाही दिसला
दिसली नाही फाटकी चप्पल
दिवसरात्र झटायचा आपल्या साठी
कष्टाने पडले रे टक्कल……

हट्टासाठी तुझा अविचारी गळफास
पोरक्या झालो रे आम्ही बहिणी
आधार तुटला रे आई बापाचा
पोकळी तुझी मिळेल का संजीवनी

म्हणे मरावे परि कीर्तीरुपी उरावे
बनून राहिली व्यथा ही कथा
जगण्याला जागलास का रे….
तुझ्या फोटोकडे पाहून जगायचे आता

*सौ.सिंधू बनसोडे*
*इंदापूर.पुणे*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🍃🌸🍃♾️♾️♾️♾️
*गळफास*

जगतोस तु जगासाठी
पाठीचा कणा देशासाठी
विश्वाचा तु पोशींदा
गरीबच कां रे तु गोविंदा ||

अठराविश्व दारिद्र्य तुझ्या पदरी
सत्ताधारी पांघरतात सोनेरी चादरी
राब राब राबतो मातीच्या शेतात
आम्ही जगतो एसीच्या झोक्यात ||

खातोस तु कांदा भाकर
पोटभर खाऊन देतो ढेकर
धरती तुझी माय नभ तुझा बाप
मातीच्या खुशीत खुशाल झोप||

निसर्ग कधी कोपे भारी
पिकाची सारी नासाडी करी
इच्छा कधी पुर्ण न होई
कर्जाचे डोंगर उभे राही ||

सावकार करतो गळचेपी
पायपीट करतो स्वताची
वाटतो हा त्याला सर्व भास
हिरमूसन शेतकरी लावी गळफास ||

*रंजना राहूल ब्राह्मणकर*
*अर्जुनी/मोर. जि. गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार*
♾️♾️♾️♾️🍃🌸🍃♾️♾️♾️♾️
*गळफास*

वणवा पेटला,सुख जळाली
असे कधी झाले नाही,असे नाही
वाळवंटात ही बीज अंकुरली
असे कधी झाले नाही,असे नाही…१

संकटाचे वादळे,आयुष्यात आली
असे कधी झाले नाही,असे नाही
राखेतुन फिनिक्सने भरारी घेतली
असे कधी झाले नाही,असे नाही…२

हादरली माणसे,भूकंप त्सुनामीने
असे कधी झाले नाही,असे नाही
पुन्हां फुटली नवतीची पाने
असे कधी झाले नाही,असे नाही…३

अपयशाने खचली माणस
असे कधी झाले नाही,असे नाही
जीवन उदवस्त गळफासाने
असे कधी झाले नाही,असे नाही…४

*श्री पैठणकर सर*
*नाशिक*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह”*
♾️♾️♾️♾️🍃🌸🍃♾️♾️♾️♾️
*गळफास*

गळफास घेऊन प्रश्न कधी मिटत नसतो
डोक्याला हात लावून बाबा तू कशाला बसतो ?

संकटावर मात करण्याची आहे तुझ्यातच शक्ती
अवतार देव घेत नसतो कितीही केलीस तू भक्ती

जीवन हे सुंदर घेशील का तू जगण्याचा आनंद ?
कष्टाचीच भाकर खाण्याचा असावा मनी छंद

दागिन्यांनी सजविल्याने गाढव बनत नाही घोडा ?
सोन्यानं पोट भरत नसते हव्यास तो सोडा ?

ज्ञान हेच श्रेष्ठ धन,नको अहंकार संपत्तीचा
धसका का घेतोस मानवा नैसर्गिक आपत्तीचा ?

अंधारातून प्रकाशाकडे प्रवास जीवनाचा असावा
सावित्री,जिजाऊ,रमाईचा वसा सांगण्यापुरता नसावा

संकटाच्या छाताडावर लाथ मारून पुढेच तू चाल
संकटमोचक ,विघ्नहर्ता कधीच बनत नसतो रे ढाल

गळफासाचा विचार आत्मघाती होईल काय सार्थक ?
अनमोल जीव गमावू नये,विचार करून निरर्थक

*श्री.संग्राम कुमठेकर*
*मु.पो.कुमठा (बु.)*
*ता.अहमदपूर जि.लातूर*
*सहप्रशासक/परीक्षक/संकलक*
*©️मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🍃🌸🍃♾️♾️♾️♾️
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖

*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏

➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles