चिखलदरा येथे दाट धुक्याची चादर; हुडहुडीने पर्यटक सुखावले

चिखलदरा येथे दाट धुक्याची चादर; हुडहुडीने पर्यटक सुखावले



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अमरावती: विदर्भातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण असलेल्या चिखलदरा येथे मागील चार दिवसापासून सतत पडत असणारा भुरभुर पाऊस आल्हाददायक असून, सर्वत्र धुक्याची चादर पसरली असल्याचे चित्र आहे. काल (दि १४) रोजी अंधाराचे साम्राज्य दिसून आले. खरे पाहता जसजसे नागमोडी वाटेने वरवर जातो तसतशी धुक्याची चादर ही दाट होते. वाहन चालकांना वाहने चालवतांना अक्षरश: भर दुपारी वाहनांची लाईट लावून धुक्यातून वाट काढावी लागत आहे. तर हुडहुडी भरल्याने पर्यटकही सुखावला आहे.

चिखलदरा येथे सतत तीन चार महिने असे वातावरण असल्याचे दीपशिखा सैनिक स्कूलच्या अखिलेश पाटील या विद्यार्थाने सांगितले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने मध्यंतरी पर्यटन महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आल्याचेही सांगितले. या ठिकाणी शनिवार, रविवार पर्यटकांची खूप धूम असते. परंतु वेगात वाहन चालविल्याने अपघात होण्याची शक्यता असल्याने, पर्यटकांनी जीव धोक्यात टाकून हुल्लडबाजी करू नये असेही सूचविले आहे.

राज्यात चार ते पाच दिवस संततधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असल्याने या दिवसात पर्यटकांनी काळजी घेऊन प्रशासनास सहकार्य करावे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles