पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी करीनिमित्त काटा येथील शेतकऱ्यांनी बैल जोडी ऐवजी काढली ट्रॅक्टरची मिरवणूक

पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी करीनिमित्त काटा येथील शेतकऱ्यांनी बैल जोडी ऐवजी काढली ट्रॅक्टरची मिरवणूक



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_ग्रामदैवत चांदाई देवीचे घेतले दर्शन_

_कर निमित्त पहिल्यांदा राज्यात निघाली ट्रॅक्टर रॅली_

वाशिम: पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी करी निमित्त बैलांना देवदर्शनासाठी नेल्या जाते आणि निरोगी आरोग्यासाठी प्रार्थना केल्या जाते. तंत्रज्ञान आणि कृषी क्षेत्रामध्ये झालेल्या आमूलाग्र बदलामुळे सध्या बैलाची संख्या कमी झाली असून बहुतांश शेती ट्रॅक्टरद्वारे केली जाते. अर्थात बैलांची जागा आता ट्रॅक्टरने घेतल्याने पोळ्याच्या दिवशी शेतकरी ट्रॅक्टरचेही पुजन करतात.

वाशीम जवळील काटा या गावामध्ये पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी कर हा उत्सव साजरा केल्या जातो. या दिवशी काटा या गावातील शेतकऱ्यांनी आपले ट्रॅक्टर सजवून वाजत गाजत ट्रॅक्टर रॅली काढून ग्रामदैवत चांदाई ममातेचे दर्शन घेतले. बैल जसा शेतकऱ्यांना प्रिय आहे त्याचप्रमाणे ट्रॅक्टरप्रतीही शेतकऱ्यांनी कृतज्ञता भाव जोपासला असून यावेळी 40 ट्रॅक्टर यामध्ये सहभागी झाले होते. बहुतांशी राज्यात पहिल्यांदाच अशी ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles