शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना

*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट सात🎗🎗🎗*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*☄विषय : झडत्या☄*
*🍂शनिवार : १६ / सप्टेंबर/२०२३*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*झडत्या*

जोरास्नी अभाळ गळगळे
सरकारचे शि॑ग फडफडे
आन राज्यकर्त्याची बायको
कढईभर तेलामंदी राऺधते
लय मोठे मोठे वडे …
खाऊनशान सुटे पोटाचे ढेरे
आमच्या कुणब्याला चतकोराचे वाऺदे
त्याच्या पार्वतीच्या लुगड्याले
शंभर ठिगळे|
एक नमन कवडा पार्वती|
हरभोला हर हर महादेव||

तरीबी सर्जा राजाले ती सजवे
लेकरापरीस तो तिच्या जन्माले पुरे
राज्यकर्त्याने देल्ली पोळ्याच्या अवसरी
कर्जमाफीची गुटी निगली तिही बेचव
कास्तकाराले आता उपासमारीचऺ भेव..
पोळा रे पोळा..आता एकोपा करा
कुणब्याच्या पूरण हक्कासाठी…
झडत्या म्हणत कुरणावर व्हा गोळा ||
एक नमन गौरा पार्वती |
हर बोला हर हर महादेव ||

*तारका रुखमोडे*
*अर्जुनी\मोर, गोंदिया*
*©परीक्षक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🍃🐄🍃♾️♾️♾️♾️
*झडत्या*

लोकपरंपरेची असे शान
बैलपोळ्यास मिळतो मान
गाण्याची सापडे खान
कलेचा हा सन्मान

वास्तव परिक्षणाची वेळ
काय चाले समाज स्तरावर
मांडणी भारदस्त सत्वर
ऐकण्या वाटे मजा फार

जमती मंडळी पारावर
ऋण व्यक्त करती सारं
पुजती बैला घालून हार
लग्नाचा देती उडवून बार

आटोपता सगळे कार्य
निवळावे आता वातावरण
अचानक झडतो बार
झडत्या साठी आतूर कान

देशातील समस्यांपासून
शेतकऱ्यांचा हाल हवाल
करती नेटकी टिप्पणी
उघडे पडते सरकार

स्वलिखित कलेचा प्रकार
व्हावा सगळीकडे प्रचार
कान उघडणी व्हावी सराकारची
सरकारने लावावा जनता दरबार

तरच लोकशाही टिकेल
धन धान्यादी पिकेल
शेतकरी राजा हसेल
जेव्हा मंत्रिमंडळ जनतेत बसेल

*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🍃🐄🍃♾️♾️♾️♾️
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध १०२ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे. कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.०० पर्यंत पाठवावे. विजेत्यांनी कधीतरी निवडलेली रचना साप्ताहिकासाठी पाठवावी (सूचना काळजीपूर्वक वाचावी. ३१ मार्च रोजी वार्षिक सभासदत्व संपलेल्या सदस्यांनी पुनर्नोंदणी करावी)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿
*झडत्या*

बुडत्याला म्हणे रे काडीचा आधार
समूहातील झोपल्यानां करतो रे झडत्या चा जागर
वाचून पावा लिवून पावा सांगून झाले रे खूप
थकून गेले सांगणारे का बसता रे चुप
कोणता सांगा तूमाले जडला रे आजार
सांगून सांगून संज्या झाला रे लाचार
एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव

जत्रा भरली येथं झाडून पुसून सारेच रे कवि
लाज वाटे म्हणुन लपला रे रवी
तुमच्या लेखणीला पुन्हा येवो रे ताकत
नेहमी देवाले हेच असतो रे मागत
लिवान तं लिवा नायीतं झोपून जावा
तुमच्या झोपेचा मले वाटतो रे हेवा
एक नमन गौरा पार्वती….

मनात कल्पना, पेनात रे स्यायी
तरी का तुमची कोरीच वही
नायी लिवान तं तूमच्या बुद्धीले लागन रे जंग
कोणता उपाव कराल रे मंग
थकता भागता माहीत आहे रे मले
पण दोन शब्द काय होते लिवाले
एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव…

*डॉ. संजय भानुदास पाचभाई नागपूर*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🍃🐄🍃♾️♾️♾️♾️
*झडत्या*

सुरु झाल्या हो पोळ्याच्या झडत्या
म्हणण काय ते लक्ष देऊन ऐका

वाडा रे वाडा
शेतकऱ्याचा वाडा
त्यावर आहे सावकाराचा डोळा
वरुणाला विनंती पाऊस आता पाडा
सुकून गेलाय शेतातला दाणा
आस्मानी,सुलतानी साधत्यात दावा
सरकार वाजवतयं भलताच पावा
सरकारी योजनांना लागलाय टाळा
सरकार विरोधी मौन आता पाळा
तरी होऊ दे सुखाचा पोळा
एक नमन गौरा पार्वती हर बोला
हर हर महादेव

*सौ. रजनी भागवत.*
ऐरोली, ठाणे
*©सदस्या- मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🍃🐄🍃♾️♾️♾️♾️
*झडत्या : -*

पक्ष बदनाम झाले
भ्रष्टचारी नेत्यांमुळे
अराजकता माजली
देशात बंडखोरीमुळे ॥

अच्छे दिनाचे बोलबोच्चन
मोदीचा उदो उदो बोलबाला
महागाईला ऊत आला
काला धन नही निकाला ॥

करात वाढ जिएसटी
मंदावली भरभराटी
डोकेदुखी वाढलिया
झंडू बाम लावा ललाटी ॥

मंत्रीमहोदय राजे जोमात
कार्यकर्ते प्रजागण कोमात
नोकरभरती कंत्राटी स्वरुपी
बेरोजगार झाले तरूणांचे हात ॥

झङत्या देई शासनविरोधात
सोशल मिडिया नाही पहावत
आरक्षणासाठी उपोषणे
लिहावे खंताने कहावत ॥

*प.सु.किन्हेकर,वर्धा*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🍃🐄🍃♾️♾️♾️♾️
झडत्या*

कोंबडा आरवताच
अवघा गाव जागा झाला..
‘आज पोळ्याचा सण’
आली लगबग कामाला…

गावचा मंदिर सजला,
अगदी नवरदेवावानी…
पोंग्यावर वाजू लागली,
झडत्यांची गाव गाणी…

भरला बैलांचा पोळा
सारा गाव झाला गोळा…
रंग चढला झडत्यांवर,
अगदी आगळावेगळा…

काढली कुणाची गद्दारी
पकडली कुणाची चोरी…
झडत्या मधून बाहेर आले
देशाचे नितीभ्रष्ट पुढारी….

ही गावाकडची लोककला
लईच आहे बा भारी…
समक्ष वाभाडे काढायची,
ही रीत आहे बा न्यारी….

‘हर हर महादेव ‘गजरात
झडत्यांची झाली सांगता…
फुटला बैलांचा पोळा
गाव झाला पांगता…

*सौ वनिता गभणे*
*आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🍃🐄🍃♾️♾️♾️♾️
*झडत्या*

करुन शृंगार बैलांचा
भरवल्या जाते पोळा
‘झडत्या’ नव्या ऐकाया
सारं गाव होती गोळा

गाणी झडत्याच्या सरस
ऐकण्याची मेजवानी
काही नव्या काही जुन्या
काही आनंदाच्या गाणी

सुवास दरवळे पुरणाचा
अख्या गावात गल्लोगल्ली
तृप्त होऊन जातात क्षणार्धात
वैभव पाहून सणांचे हल्ली

उपदेशपर असतात झडत्या
तर काही कुरापती काढणाऱ्या
माणसांच्या वर्तनावर मग
हलकेच ‘ ताशेरे ‘ ओढणाऱ्या

क्षणभरासाठी हल्ली
भरत असते जरी पोळा
शहरातल्या माणसांचा
खेड्याकडे असतो ओढा

भांडण-तंटे, वाद अंतरीचे
सणांमुळेच मिटतात खरे
मनातली माणसे माणसानां
भेटल्यास वाटते बरे

गाणी ‘झडत्या’च्या आपण
पुन्हा – पुन्हा मिळून गाऊ
वाद अंतरीचे मिटवून
गुण्या-गोविंदाने राहू

*इंदुरवार बी.आर*
*किनवट,जि.नांदेड*
*© सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖

*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏

➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles