बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना

*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ कविता स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट अकरा🎗🎗🎗*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*🥀विषय : अंधश्रद्धेचे ढग🥀*
*🍂बुधवार : २० / ०९ /२०२३*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*अंधश्रद्धेचे ढग*

प्रयत्न आणि ईश्वर
फरक कळावा स्पष्ट
येथे अंधश्रद्धेचे ढग
तेंव्हाच होतील नष्ट.. //

समजून घ्यावा आधी
प्रत्येकाने प्रयत्नवाद
मगच मनातून निघेल
जोपासलेला दैववाद..//

कर्मसिद्धांत सर्वश्रेष्ठ
मुंगीलाही ना चुकला
ज्याला नाही कळला
तो प्रगतीला मुकला..//

गंडे, दोरे, ताईतांचा
केवळ भुल भुलैय्या
लबाड भोंदू बाबांना
कशी भुलतेय दुनया.. //

भूता खेतांची बाधा
लिंबू मिरची उतारा
दुर्धर आधी व्याधींचा
उपाय केवळ अंगारा.. //

सुशिक्षित समाजाची
हिच खरी शोकांतिका
अंधश्रद्धा मुक्त भारत
कधी व्हावी सुखांतिका?.. //

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⭐🍃⭐♾️♾️♾️♾️
*अंधश्रध्देचे ढग*

घालविण्या अंधश्रध्देचे ढग
वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवा..
सत्य असत्य पडताळा पहा
खरे काय ते मनावर बिंबवा…

बुवाबाजी ढोंगी साधू बनून
दिवसाढवळ्या हे लुटतील..
कळतंय तरीही वळत नाही
उघड्या डोळ्यांने पाहतील…

श्रध्देच्या आड वास करतेय
अंधश्रद्धा रुजतेय डोक्यात..
कितीही करा कानउघाडणी
पटेना यांना येईना ध्यानात…

दार उघडे ठेवतील रात्रभर
लक्ष्मी घरात यायला म्हणून..
सपडासाप करून जातील
चोर हाय तीच लक्ष्मी घेऊन…

कुणी म्हणे बापा दूध प्याले
अफवा पसरवल्या जातील..
न जाणता वैज्ञानिक कारण
बघ्यांच्या तर रांगा लागतील…

चंद्रावर प्रयाण झालयं जरी
अंधश्रध्देचं खूळ जात नाही..
विज्ञान प्रगती साधतय पण
अंधभक्ताला जाणीव काही..?

अंधश्रध्देविरुद्ध जर कोणी
आवाज उठवला बोलायला..
खून करतील, जीव घेतील
पाहतील विचार संपवायला…

*✍️बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⭐🍃⭐♾️♾️♾️♾️
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध १०३ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे. कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.०० पर्यंत पाठवावे. विजेत्यांनी कधीतरी निवडलेली रचना साप्ताहिकासाठी पाठवावी (सूचना काळजीपूर्वक वाचावी. ३१ मार्च रोजी वार्षिक सभासदत्व संपलेल्या सदस्यांनी पुनर्नोंदणी करावी)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿
*अंधश्रद्धेचे ढग*

नको अंधश्रद्धा
अन् कर्मकांड
सांगती संत
शिकवण गोड

अंधश्रद्धेचे ढग
दाटले विज्ञानयुगी
राख फासून अंगाला
करतात त्यांची सुगी

शिक्षण घेऊन
आम्ही निरक्षर
आमच्याच घरी
अंधश्रद्धेचा बाजार

स्वप्न महासत्तेचे
होईल कसे साकार
बुवाबाजीने ग्रासले
जादुटोणा विकार

थोतांड समूळ
नष्ट करुया
विज्ञानाची आपण
कास धरुया

*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
मुखेड जिल्हा नांदेड
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⭐🍃⭐♾️♾️♾️♾️
*अंधश्रध्देचे ढग*

दूर करा अंधश्रद्धेचे ढग
मनातील घालवा भूत
व्हा सर्वांनी सजग
नका करू मन कोत ॥१॥

कर्मावर ठेवून विश्वास
सत्कर्माने सोडवा गुंता
धरून सत्याची कास
अंधश्रद्धेची करा सांगता ॥२॥

श्रध्दा निर्मळ असावी
पण ती अंध नसावी
विज्ञानाचे करून अवलोकन
आपली दिशा ठरवावी ॥३॥

मनाने विचार करून
शास्रीय ज्ञान मिळवून
बुवाबाजी द्या सारून
द्यावी वैज्ञानिक बाजु मांडून ॥४॥

सखोल अभ्यास करून
थोतांडाला लावा पळवून
नको असत्याला थारा
सत्याचे जा बोट धरून ॥५॥

तोल मनाचा न ढळता
अघोरी प्रथा द्या उधळुन
करून दाखवा अवयवदान
परिसंवाद आणा घडवून ॥६॥

दृष्टिकोन स्वत:चा बदलून
अंधश्रद्धेचे करा निर्मूलन
सिध्द करा होऊन निर्व्यसनी
शिक्षण शिबीर राबवून ॥७॥

*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⭐🍃⭐♾️♾️♾️♾️
*अंधश्रद्धेचे ढग*

विज्ञान युगाच्या मारतो बढाया
तरीही भितीपोटी अंधश्रद्ध जग
का पसरले चोहिकडे असे हे
काळोख्या अंधश्रद्धेचे ढग?..

अंधश्रद्धा आहेत आजही
कितीतरी या समाजात
साध्या चुकीच्या समजूतीतून
कितीदा होतो विश्वासघात…

करावा सारासार विचार नेहमीच
अघटित त्या घटनांचा
शास्त्राधार शोधावा चातुर्याने
त्यामागील कारणांचा….

फसवणूक करतील भोंदू लोक
अडकू नये त्यांच्या जाळयात
सुबुद्ध राहून प्रतिकार करावा
अंजन घालावे त्यांच्याही डोळ्यात..

अंधश्रद्ध लोकांनी जागरूक व्हावे
चुकीच्या मार्गाने जाऊ नये
कारण आणि परिणामांचा विचार
केल्याशिवाय राहू नये….

*श्री.पांडुरंग एकनाथ घोलप ता.कर्जत जि.रायगड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⭐🍃⭐♾️♾️♾️♾️
*अंधश्रद्धेचे ढग*

पोरग तापान घरी
फणफणत होत
त्याला नाही नेल
बापान दवाखान्यात

म्हणे भूतान झपाटलं
त्याले नेल भोंदूबाबाकडे
त्या पोराचे हाल अजूनच
ताप वाढला कलटे इकडेतिकडे

भोंदूबाबान सांगितलं
तुझ्या शेजाऱ्यान केलं
तुझी सारी संपत्ती ठेव
पुजेवर बाबान म्हणलं

खुप दिवस शाळेत येत नाही
म्हणून बाई आल्या घरी बघाया
पोरगं मराले टेकलं होत बघून
बापाला म्हटलं दवाखान्यात न्या

अंधश्रद्धेचे ढग मनात जमले
बाप गेला भोंदूबाबाच्या आहारी
अंधश्रद्धेपाही पोरगं मेलं तरी
बाबाचे उपचार सुरूच अघोरी

*सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⭐🍃⭐♾️♾️♾️♾️
*अंधश्रद्धेचे ढग*

केले जरी तुम्ही समाजप्रबोधन भजनात आहे
अंधश्रद्धेचे ढग माळले या माणसात आहे

भोळ्या जनतेस ते फसवतात नेहमी
देह व्यापार चालतो त्यांच्या आश्रमात आहे

तेरी भी चूप मेरी भी चूप सारे चालते बोभाट
इतकी शक्ति आज त्यांच्या दानात आहे

लिंबू मिरची अन राखेची फाकाफूकी
सारेच वाटते तिथे धाकात आहे

सर्पदंश होता धाव घेतो त्या बाबाकडे
अजूनही अंधश्रद्धेचे ढग गावागावात आहे

*डॉ. संजय भानुदास पाचभाई नागपूर*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⭐🍃⭐♾️♾️♾️♾️
*अंधश्रध्देचे ढग*

विकसीत यंत्रणा
तंत्रज्ञानाचे युग
एकविसाव्या शतकातही दिसते
व्यापताना अंधश्रद्धेचे ढग

बुवाबाजी, भामटे, साधू
नाही ते लोककल्याणकारी
पैसा लुबाडणे त्यांचे कार्य
असावी तुम्हां जाणकारी

हात दावूनी भविष्य पाहणे
यातच करतात फसगत
भया, भितीपोटी लाचार होऊन
माणसा बळी पडतात

देवा – बाबा करता लोकां
दाखवी अपत्य होण्याची आमिष
नियत असते फोल यांची
म्हणे होतील तुम्हां वारीस

कुठपर्यंत बळी पडाल लोकां
जागीच ठेचा अशा माणसांना
करावे एक खूण माफ सरकारा
दाखवू त्यांची जागा त्यांना….!

*पु. ना. कोटरंगे*
ता. सावली, जि. चंद्रपूर
*©सदस्य :- मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️⭐🍃⭐♾️♾️♾️♾️
*अंधश्रद्धेचे ढग*

विज्ञान युगात,स्तोम माजले
बुवाबाजी,अन रूढी परंपरेचे
जमू लागले,अंधश्रद्धेचे ढग
शिलेदार आम्ही डोळस दृष्टीचे.

सत्य असत्य, तपासून पाहू
नका,ठेवू डोळे झाकून विश्वास,
विज्ञानाचे पाईक आम्ही सारे
अंधश्रद्धेविरुद्ध, लढू हमखास.

ढोंग बुवाबाजीनें ,स्तोम माजवीले
सामान्य जनता भरडली त्यात
व्यक्तीच्या,मेंदूवरच्, हल्ला करून
ठेवले, साऱ्या जनतेला अंधारात.

पिचलो आम्ही गुलामगिरीत.
विचार स्वातंत्र्य गहान पडले,
झाला,सवयीचा तो एक भाग
आणि म्हणे अंधारातहीं चांदणे पडले.

*मायादेवी गायकवाड* मानवत परभणी
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*.
♾️♾️♾️♾️⭐🍃⭐♾️♾️♾️♾️
*अंधश्रद्धेचे ढग*

शिकले तितके हुकलेले सांगायला लाज वाटती
जितके जास्त शिकले तितके जाळ्यात फसती

अडाणी अडगळीतले यांना उल्लू बनवती
हात चमत्कार भिती दाखवून लाखो रूपये लाटती

बाबा बाई गंडे दोरे बघणाऱ्यांकडे यांचीच गर्दी
पांढर पेशी लोकांचीच आधी असते वर्दी

कशी संपवायची अनिष्ट प्रथा अन् अंधश्रद्धा
अवतार बदलून भोंदूगिरी करणाऱ्यांवर यांची श्रद्धा

शिकलेलेच नव्हे डॉक्टर सुद्धा याला पडतात बळी
अंधश्रद्धेचे ढग सांगा कसे हटून खुलेल विज्ञानाची कळी

*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⭐🍃⭐♾️♾️♾️♾️
*अंधश्रद्धेचे ढग*

सण समारंभाच्या मोसमात
वृत्तवैकल्याचे वारे सुटले
भक्ती परिपक्व होण्याआधी
अंधश्रद्धेचे ढग फुटले .

धनाच्या लालसेपोटी
जादूटोणा बुवाबाजी
विवेकबुद्धी गहाण पडली
पोराचा बळी द्यायला राजी.

चंद्रावर पडले पाऊल तरी
गंडे दोरे अंगारे धुपारे
विज्ञानाचा मार्ग डावलून
अंधश्रद्धेचे चक्रव्यूह प्यारे.

मिरची लिंबू मंत्र तंत्र
देवऋषीचा पोटाचा धंदा
भोळी भाबडी जाळ्यात फसली
कष्टाविना रोजी रोटीचा वांदा.

*सौ विमल धर्माधिकारी*
*सातारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖

*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏

➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles