‘स्मशानातील विवाह’, नव्या पर्वाचा प्रारंभ; सविता पाटील ठाकरे

‘स्मशानातील विवाह’, नव्या पर्वाचा प्रारंभ; सविता पाटील ठाकरेपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

‘खरं तर त्या लग्नात सनई, चौघडा, मंगलाष्टक’ या साऱ्यांसोबत एक नवी गोष्ट होती. अंगणात, हॉल, कार्यालय या ठिकाणी सर्वच लग्न करतात. पण अहमदनगर जिल्ह्यातील राहता येथील स्मशानभूमीत एक आदर्श विवाह पार पडला. स्मशानभूमीत जनसेवेचे वीस वर्षापासून काम करणारे, ‘गंगाधर गायकवाड’ यांनी आपल्या मुलीचा विवाह स्मशानभूमीत लावला अन् अनेकांच्या भुवया उंचावल्या. या घटनेने माझ्या मनातही एक विश्वास निर्माण झाला,की “अंधश्रद्धेचे ढग” दूर जाणार याचा हा प्रारंभ तर नव्हे?

स्वर्ग, नरक हे गैरसमज आहेत हे पटवून देतांना, युगपुरुष, समाजवादी, सत्यशोधक संत गाडगेबाबा नेहमी कबीराच्या या दोह्याचे उदाहरण द्यायचे. “जित्या नाही अन्न मेल्यावर पिंडदान”, ” जिते बाप को रोटी ना दे मरे बाद पछताये”. जिवंतपणी आई बापाला वृद्धाश्रमात ठेवायचे आणि मेल्यावर मोठं पिंडदान करायचे.. कसे स्वीकारणार आपण?? ग्रंथप्रामाण्य, पोथीनिष्ठता, सण,श्राद्ध याला कुठेतरी मुरड घाला हा संदेश गाडगे महाराज त्या काळातही देत. आंधळेपणाने एखादी गोष्ट स्वीकारणे म्हणजे अंधश्रध्दा. समाजातील अज्ञानाचा फायदा घेऊन विघातक कृतींकडून मानवाचे होणारे शोषण म्हणजे अंधश्रद्धा. पोकळ, आभासी पण ज्याची मूळं खोलवर रुजलेले आहेत ती म्हणजे ‘अंधश्रद्धा’.

मांजर आडवी जाणे, टिटवी ओरडणे, घुबड दिसणे, जोड कावळा पाहणे, दारावर शिंकणे यापासून सुरू झालेला हा प्रवास कधी भूत प्रेतच्या नावाने महिलांच्या वेण्या कापण्यापर्यंत पोहोचला. तर कधी तिला डायन समजून तिची हत्या केली गेली. कधी नरबळी दिला गेला, तर कधी स्वतःच्या मोक्षप्राप्तीसाठी इतरांना फाशी देण्यापर्यंत मजल गेली. कधी गंडा, दोरा तर कधी चाबूकचे फटके. देवाधर्माच्या नावाने ज्योतिष, भविष्य याचा अतिरेक तर कधी सत्याचा बाजार मांडला गेला. जीवनाला दिशा मिळण्यासाठी देवावर श्रद्धा असणं अत्यावश्यक आहे; तरीही प्राधान्य हवे ते केवळ मानवधर्माला पण आज. कुठे कंबलवाला बाबा, तर कुठे फरशीवाला. कुठे आढी जागरण, तर कुठे अघोरी उपाय. प्रागतिक विचारांचा पुरस्कार करून देश पुढे घेऊन जाताना अंधविश्वासाने बरबटलेल्या लोकांच्या मनातून ही घाण जोवर नष्ट होत नाही, तोवर आपण स्वतःलाच पुढारलेलं समजणं म्हणजे, स्वतःची पाठ थोपटून घेण्यासारखे आहे. स्वतःला फक्त म्हणताना विज्ञानवादी असणारे आम्ही, आजही वीस पंचवीस लाखाला नवी कोरी गाडी घेतो आणि दर शनिवारी त्या गाडीला लिंबू मिरची बांधतो. बुवाबाजी, भूतखेत, ज्योतिष, चमत्कार ही सर्व थेरं आहेत. ज्याच्या मनगटात जोर आहे ना तो कधीही या गोष्टींच्या मागे लागत नाही.
असो..!

समाजातील अंधश्रद्धा नष्ट करतांना तिच्या मुळावर घाव घालण्यासाठी अनेकजण प्रयत्न करतायेत त्यात जर कवी कवयित्रींची भर पडली तर; निश्चितपणे अंधश्रद्धा कमी होण्यास मदत होईल हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून आज ‘बुधवारीय काव्यरत्न’ स्पर्धेसाठी आदरणीय राहुल सरांनी ‘अंधश्रद्धेचे ढग’ हा विषय दिला व प्रबोधनात्मक लिहिण्यासाठी सर्वांना प्रवृत्त केले यात बरेचसे जण यशस्वीही झालेत. सर्वांनी आपापल्या परीने अंधश्रद्धेचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तुम्हा सर्वांचे मनापासून अभिनंदन पुढील लिखाणास अनंत कोटी शुभेच्छा.

पण थोडं काही……..

आज मी आवर्जून उल्लेख करू इच्छिते ज्येष्ठ कवी केशवसुत यांचा. केशवसुतांची काव्य विषयक निष्ठा अविचल होती यात संशय नाही. कवितेचे आराधन म्हणजे, त्यांच्या दृष्टीने एक उग्र व्रत होते. त्याची एकदा दीक्षा घेतली म्हणजे हृदय उलते फाटते नवे ते तसे फाटायलाच हवे ही त्यांची धारणा होती. कवितेच्या सामर्थ्यावर त्यांची निश्चित श्रद्धा होती. केशवसुतांची व्यक्तिमत्व समर्थ होते, म्हणून त्यांना निष्ठेची जोपासना सातत्याने करता आली. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रेरणा आणि सौंदर्यवादाच्या प्रवृत्ती सर्वस्वी
परस्पर पूरक ठरल्या. चला तर आपणही प्रयत्न करूयात केशवसुतांचे काही गुण आपल्यामध्ये येवो व आपल्याही लेखणीला बळ मिळो. तूर्तास थांबते…!

सविता पाटील ठाकरे, सिलवासा
मुख्य परीक्षक, प्रशासक, कवयित्री, लेखिका

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles