निवृत्त बँक कर्मचारी संघटनेचे अधिवेशन संपन्न

निवृत्त बँक कर्मचारी संघटनेचे अधिवेशन संपन्न



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अमृता खाकुर्डीकर, पुणे

पुणे-: युनायटेड वेस्टर्न बँक आणि आयडीबीआय बँक निवृत्त कर्मचारी संघटना यांनी आयोजित केलेले वार्षिक अधिवेशन सातारा येथे प्रसिध्द मानसोपचारतज्ज्ञ डाॅ.प्रसन्न दाभोळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

स्वराज सांस्कृतिक भवन येथे आयोजित या २६ व्या वार्षिक राष्ट्रीय अधिवेशनाच्या उदघाटन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डाॅ.
प्रसन्न दाभोळकर यांनी उपस्थित निवृत्तांना कौटुंबिक सुसंवाद वाढविणे, स्वभावात सकारात्मक बदल घडवणे व निरामय निकोप आयुष्य जगणे याबाबत सोदाहरण मार्गदर्शन करून वाचन, मनन ,आत्मचिंतन करण्यात शांतपणे वेळ घालवण्याचे आवाहन केले.

बँक अधिकारी संघटनेचे माजी सचिव दत्ताजी भिडे यांनी संपूर्ण भारतातून ५०० पेक्षा जास्त संख्येने अधिवेशनास उपस्थित राहील्या बद्दल सर्व सदस्यांचे आभार मानून सातारकरांच्या वतीने स्वागत केले. सरचिटणीस एस. जी.चौधरी यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ए.के.कुलकर्णी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संघटनेच्या स्थापनेपासूनचीं वाटचाल,प्रगती व संस्थेची उद्दिष्टे, त्यानुसार चालणारे कामकाज यांबाबतची माहिती देऊन सदस्यांसाठी असलेल्या कल्याणकारी योजना व इतर सामाजिक कार्याविषयी सविस्तर माहिती दिली.

वयाची ७५ वर्ष पूर्ण झालेल्या सदस्यांचा संघटनेतर्फे शाल श्रीफळ,पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देवुन सन्मान करण्यात आला. संघटनेचे उपाध्यक्ष श्री आष्टेकर व कार्यकारिणी सदस्य चंद्रकांत सोमण यांनी प्राॅव्हिडन्ट फंड,पेन्शन याविषयी निवृत्तांच्या हिताचे काही ठराव मांडले. ते एकमताने पारीत झाले. यावेळी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. निवडणुक अधिकारी म्हणुन राजाभाऊ परांजपे यांनी काम पाहिले.

कार्यक्रमाच्या प्रथम सत्राचे सूत्रसंचलन निवृत्त अधिकारी श्री. व्ही.डी.कुलकर्णी यांनी केले. दुपारच्या सत्राचे सुत्रसंचलन सुर्यकांत वझे यांनी केले व नरेश बिंदू यांनी आभार प्रदर्शन केले. चाळीसगावचे सद्स्य श्री. कुलकर्णी यांनी गायिलेल्या वंदेमातरम् गीताने अधिवेशनाची सांगता झाली. अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी कार्यकारिणी सदस्य सूर्यकांत देशमुख, प्रविण देशपांडे, प्रकाश शहाणे, अशोक कुलकर्णी,शशिकांत पंडीत इत्यादींनी परिश्रम घेतले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles