‘विखुरलेली क्रयशक्ती जेव्हा विधायक कार्यासाठी एकवटली जाते’; विष्णू संकपाळ

‘विखुरलेली क्रयशक्ती जेव्हा विधायक कार्यासाठी एकवटली जाते’; विष्णू संकपाळपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

शुक्रवारीय हायकू काव्य” स्पर्धेचे परीक्षण

“शुक्रवारीय हायकू काव्य” स्पर्धेसाठी दिलेले चित्र पाहून मला, जानेवारी 1982 साली सुरू झालेल्या मुंबई गिरणी कामगारांचा संप आठवला. मी त्यावेळी सातवीच्या वर्गात असेन. आमच्या कोल्हापूर ग्रामीण भागातील सत्तर ऐंशी टक्के लोक मुंबईत उदरनिर्वाहासाठी गेलेले असायचे. त्यातले बहुतांश गिरणी कामगार होते. संपाचे गांभीर्य समजण्याचे माझे वय नव्हते. मात्र खूप दिवस होऊनही मुंबईवाले गावातच का? या प्रश्नाचे उत्तर हळूहळू लक्षात आले. नोकर्‍या गेल्या होत्या तरी मागे घरेदारे, तुटपुंज्या जमीनी होत्या. मात्र शहरीकरणाला सरावलेला जीव ग्रामीण भागातील उन्हातान्हात हैराण होत होता. काम तर करणे आवश्यक होते. त्याचवेळी रोजगार हमी योजने अंतर्गत शेजारच्या गावाला जोडणारा चार किमीच्या रस्ता बांधणीचे काम निघाले. आणि कधीकाळी कडक इस्त्रीच्या कपड्यात वावरणारे मुंबईकर कमरेला लुंगी, अंगात बंडी, डोक्याला टाॅवेल गुंडाळून. हातात पहारी, फावडे, टिकाव, घमेली घेऊन कामावर दाखल झाले. भर उन्हात दिवसभर कसू लागले. निथळत्या घामाच्या धारा आणि हाताला उठलेले फोड भाकरी खातानाही चटके देत होते. अंगाची लाही लाही होत होती मात्र पर्याय नव्हता. रोजगाराचा तात्पुरता प्रश्न मिटला होता.

सांघिकतेने
कर्म पूजा करती
अपेक्षा पूर्ती

“शुक्रवारीय हायकू काव्य” स्पर्धेसाठी आदरणीय दादांनी हे चित्र दिले आणि या अनुषंगाने अनेक संदर्भ समोर आले. श्रमदान हा एक बहुआयामी प्रयोग आहे. छ. संभाजीनगर जिल्ह्यातील पाटोदा हे एक असेच छोटेसे गाव. मात्र त्या गावचे सरपंच श्री. भास्करराव पेरे यांच्या कुशल नेतृत्वाने, या गावाला आदर्श गाव म्हणून राष्ट्रपती पदकाचे मानकरी बनवले. ग्रामस्वच्छता अभियान, वृक्षारोपण, आरोग्य सुविधा, आत्मनिर्भरता, स्वावलंबन, काटकसर असे नाना प्रयोग यशस्वीपणे राबवले. विखुरलेली क्रयशक्ती जेव्हा विधायक कार्यासाठी एकवटली जाते तेंव्हा सामाजिक स्वास्थ्य्याचे अनेक उपक्रम गावातच यशस्वी होतात.

जाता जाता इतकेच सांगू इच्छितो की, जपानी हायकूकार सुद्धा उत्कृष्ट हायकू निर्मितीसाठी अत्यंत आनंददायी किंवा अत्यंत वेदनादायी प्रसंगाचीच निवड करतात. आणि त्यातला उत्कट क्षण पकडून दर्जेदार हायकू काव्य निर्माण करतात. उदाहरणार्थ, ‘अतिशय अल्पायुषी असलेले फुलपाखरू स्वच्छंदी बागडताना वर्तमानातील आनंद लुटत असते. येणार्‍या काही क्षणात मृत्यू अटळ असतो’, हेच शास्वत सत्य स्वीकारून आजच्या आनंदाचा सोहळा साजरा करण्यात जपानी हायकूकार मग्न असतो. आ. शिरिष पै यांनी सुद्धा याच दृष्टीकोनातून मराठीत हायकू रूजवला.

मराठीचे शिलेदारांनी सुद्धा चित्र येता क्षणी त्याचा कार्यकारणभाव शोधण्याचा, त्याच्या खोलात शिरण्याचा प्रयत्न करून अपेक्षित कलाटणी देणार्‍या हायकू लिखाणाचा प्रयत्न करावा. केवळ सतरा अक्षरात कल्पकतेचा खरा कस लागू द्या. प्रतिभा तावून सुलाखून निघू द्या. आणि या समूहाने उपलब्ध करून दिलेल्या संधीचे सोने करा. ते ही विनामूल्य..! सर्व हायकूकारांना भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आज मला हायकू परीक्षणाची संधी दिल्याबद्दल आदरणीय राहुल दादांचा मी अत्यंतिक ऋणी आहे.

श्री विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर
परीक्षक, लेखक, कविवर्य सदस्य मराठीचे शिलेदार समूह

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles