नागपुरात ढगफुटीने जनजीवन विस्कळीत, तब्बल ४ तास बरसला

नागपुरात ढगफुटीने जनजीवन विस्कळीत, तब्बल ४ तास बरसलापुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहराला मध्यरात्री २.०० वा पासून पावसाने झोडपायला सुरुवात केली. तब्बल ४ तास पावसाची धुवाधार बरसात सुरु होती. शहरात ढगफुटी झाल्याने जनजीवन अस्ताव्यस्त झाले आहे.सिताबर्डी, मोरभवन परिसर अक्षरश: पाण्याखाली बुडाला असल्याने पालिका प्रशासन शर्थीचे प्रयत्न करीत असून नागरिकांना या ठिकाणी येण्यापासून परावृत्त करत आहे. वर्धा रोड, अमरावती रोडवरील नागरिकांच्या घरातही पाणी शिरल्याने अक्षरश: घरातील सामान, सिलेंडर पाण्यावर तरंगत आहेत. अजूनही पावसाचा जोर कायम असून, पालिका प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस सक्रीय झाला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पाऊस सुरु आहे. विदर्भासह पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्ये शुक्रवारपासून पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. विदर्भात नागपूरमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. रस्त्यावर चार ते पाच फूट पाणी साचले आहे. पुन्हा शनिवारी राज्यभर पावसाचा अलर्ट दिला आहे. काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिल्यामुळे मुसळधार पावसाचा शक्यता आहे.

राज्यात ४८ तास पावसाचे
राज्यात येत्या ४८ तासात राज्यात मॉन्सून सक्रिय राहणार आहे. राज्यातील नागपूर आणि रायगड या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. इतर सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. रायगड, भंडारा, गोंदियामध्ये तुरळक ते मुसळधार ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातील उर्वरित भागात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच २५ आणि २६ तारखेला राज्यात विजांचा कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता पुणे हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

*विदर्भात जोरदार पाऊस*

नागपूरमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. नागपूरमधील सखल भागात पाणी साचले आहे. शुक्रवारी रात्री ढगफुटीसदृश्य पाऊस नागपुरात झाला आहे. त्यामुळे मोरभवन परिसरात चार ते पाच फूट पाणी साचले आहे. नागरिक बसेवर चढून बसले आहे. नागपूरमधील अंबझरी तलावर ओव्हरफ्लो झाला आहे. भंडारा जिल्ह्यात चौथ्या दिवशीही पावसाची संततधार सुरूच आहे. जिल्ह्यातील तुमसर मोहाडी या भागात कालपासून संततधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles