रामडोह शाळेत आजी – आजोबा दिन उत्साहात

रामडोह शाळेत ‘आजी-आजोबा’ दिन उत्साहात



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अशोक लांडगे, नेवासा

नेवासा: तालुक्यातील रामडोह येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आजी-आजोबा दिन नेवासा तालुका गटशिक्षणाधिकारी शिवाजीराव कराड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व रामडोह गावाचे युवा सरपंच श्री. ज्ञानेश्वर बोरुडे यांच्या प्रेरणेने मोठ्या उत्साहात नुकताचा साजरा करण्यात आला आहे.

यावेळी प्रमुख मान्यवरांचे शाळेच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. मनोगतात सर्व आजी आजोबांनी आपल्या अनुभवाच्या आठवणी आपल्या मनोगतातून सांगितल्या. शाळेचे मुख्याध्यापक खंडागळे सर, श्रीम. मनीषा पाटोळे मॅडम व अशोक लांडगे सर यांनी आपले विचार मांडले.

आजी आजोबांचा नेहमी सन्मान ठेवावा व त्यांना आदराची वागणूक द्यावी, त्यांच्यापासून पुढील संस्काराची पिढी घडेल तसेच आई-वडील,आजी आजोबाला वृद्धाश्रम मध्ये पाठवले जाते व निराधार वृद्धांना म्हातारपणी कष्ट येऊ नये, म्हातारपणी आजी आजोबांनी आपल्या नातवंडांबरोबर सुखाचे दिवस घालवावे म्हणून हा शासनाचा उपक्रम राबवून आजी आजोबांबद्दल जनजागृती करण्यात आली आहे.

यावेळी आजी आजोबांची गाण्यांच्या साथीत पुष्पवृष्टी करून जंगी स्वागत करण्यात आले. नातवंडानी सर्व आजी आजोबांचे औक्षण करून त्यांचे दर्शन घेऊन त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी आजी आजोबांना कायम आनंदित ठेवण्यासाठी संगीत खुर्ची, उखाणा, माझी आठवण , कोडी ,जोक आदी खेळ घेऊन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यात आले व त्यांनाही मुलांसारखे जीवन जगण्याचा आनंद मिळाला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर खंडागळे सर यांनी केले तर सहशिक्षिका श्रीमती पाटोळे मॅडम यांनी आभार मानले. या सहशालेय उपक्रमाचे रामडोह आणि पंचक्रोशीमध्ये सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles