‘विरोधात बातम्या न लावण्यासाठी पत्रकारांना चहा पाजा, धाब्यावर जेवायला न्या’; चंद्रशेखर बावनकुळे

‘विरोधात बातम्या न लावण्यासाठी पत्रकारांना चहा पाजा, धाब्यावर जेवायला न्या’; चंद्रशेखर बावनकुळे



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

महाविजय २०२४ साठी भाजपा प्रदेशाध्यक्षाचा पदाधिका-यांना फुकटाचा सल्ला

नागपूर : प्रसार माध्यमातील पत्रकारांनी २०२४ पर्यंत आपल्या विरोधात एकही बातमी छापू नये. यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा, चाय प्यायला म्हणजे समजले असेल तुम्हाला, असे सांगत त्यांना धाब्यावर जेवण करायला घेऊन जा, असा सल्ला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे भाजपा पदाधिकारी च्या बैठकीत दिला.

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित रविवार (दि. २४) शहरातील सावेडी येथील माऊली सभागृहात महा विजय २०२४ विधानसभा पदाधिकारी संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बुथ रचना पदाधिकाऱ्यांना संभाळण्याचे जबाबदाऱ्या या विषयावर बावनकुळे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

ते पुढे म्हणाले, ज्या बुथवर काम कराल तेथे इलेक्ट्रॉनिकल मीडिया कोण आहेत पोर्टल मीडिया वाले कोण आहेत हे पाहावे. आपण एवढे चांगले काम करतोय, पण हे हे असं काही टाकतात की, जणू गावात बॉम्ब फुटला यासाठी बूथ वर जे चार-पाच पत्रकार यांची यादी तयार करा एक, दोन पोर्टलवाले, प्रिंट आणि इलेक्ट्रिकल मीडिया वाले असतील, यांना तुम्ही चहा प्यायला बोलवा चहा प्यायला बोलावलं म्हणजे समजले असेल, तुम्हाला त्यात काही कमी जास्त झाले तर सुजय विखे आहेतच.

महाविजय २०२४ पर्यंत बूथ संदर्भात एकही बातमी विरोधात येणार नाहीत. याची काळजी घ्या. सर्व सकारात्मक बातम्या आल्या पाहिजे. यांच्या काळजी घ्या. असे बावनकुळे म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles