राज्य शासनाच्या तुघलकी निर्णयाविरोधात आझाद मैदानावर आंदोलनाचा इशारा; कास्ट्राईब शिक्षक संघटना

राज्य शासनाच्या तुघलकी निर्णयाविरोधात आझाद मैदानावर आंदोलनाचा इशारा; कास्ट्राईब शिक्षक संघटनापुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

कास्ट्राईब शिक्षक संघटनेचा विभागस्तरीय मेळावा उत्साहात संपन्न

मराठवाड्यातील शेकडो शिक्षकांची उपस्थिती

बबनराव गायकवाड, हिंगोली

हिंगोली : कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा व सर्व तालुका शाखा हिंगोलीच्या वतीने रविवार (दि २४ रोजी )आयोजित मराठवाडा विभागस्तरीय मेळावा अतिशय उत्साही वातावरणात संपन्न झाला. अकोला बायपास रोड हिंगोली येथील साई रिसॉर्टच्या सुसज्ज हॉलमध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. राज्य शासनाच्या तुघलकी निर्णयाविरोधात आझाद मैदानावर आंदोलनाचा इशारा मराठवाडा विभागस्तरीय मेळाव्यात देण्यात आला.

मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा शाखा हिंगोलीचे अध्यक्ष मा.रमेशदादा खंदारे हे होते; तर विचारमंचावर मा.कृष्णा इंगळे अध्यक्ष कास्ट्राईब कर्मचारी महासंघ तथा कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य, मा.संजय दैने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हिंगोली, मा.संदीप कुमार सोनटक्के शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद हिंगोली, मा.दत्ता नांदे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कळमनुरी, मा. कैलासराव भुजंगळे शिक्षण विस्तार अधिकारी, मा.बी.डी. धुरंधर राज्य कार्याध्यक्ष कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य, मा.सतीश कांबळे राज्य सरचिटणीस कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य, मा.भिमराव तुरुकमाने कोषाध्यक्ष कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य,मा.परसराम गोंडाणे मुख्य संघटक सचिव कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य,मा.राहुल पाटील राज्य प्रसिद्धीप्रमुख कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य, मा.डॉ. सुभाष गायकवाड अतिरिक्त सरचिटणीस कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य,नागपूर विभागीय अध्यक्ष प्रबोध धोंगडे, मा. भिमराव सालवनकर सर, मा.मायादेवी गायकवाड कार्यकारिणी सदस्य कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य, अमरावती विभागीय अध्यक्ष अरूण सवंग, मा. राजेश सदावर्ते मराठवाडा विभागीय अध्यक्ष कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य आदी उपस्थित होते.

मेळाव्यासाठी राज्य व जिल्हाभरातील आमंत्रित अधिकारी, कर्मचारी, केंद्रप्रमुख,मुख्याध्यापक,शिक्षकवृंद,शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, विविध क्षेत्रात प्रवेश केलेले यशस्वी गुणवंत विद्यार्थी,शिक्षक व त्यांचे पालक, यांच्यासह कास्ट्राईब शिक्षक संघटना व कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी बहुसंख्यने उपस्थित होते. विचार मंचावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारत देशाच्या थोर महामानवांना अभिवादन व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

यावेळी कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा व सर्व तालुका शाखा हिंगोली च्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचे शाल व पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात प्रवेश केलेले यशस्वी गुणवंत विद्यार्थी, शिक्षक व त्यांचे पालक यांचा स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार करण्यात आला. यामध्ये मेडिकल क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील NEET परीक्षेमध्ये कोणतेही खाजगी शिकवणी न लावता सेल्फ स्टडी करून प्राप्त गुणाच्या आधारे MBBS ला प्रवेश मिळवलेला विद्यार्थी हर्षवर्धन बबनराव गायकवाड,श्रेयश भुक्तर MD साठी निवड झालेले Dr.निकिता इंगोले, Dr.शुभम वाकोडे, Dr. प्रियंका इंगोले, Dr.राजू बेले, Dr.अश्विनी इंगोले, BAMS साठी निवड झालेले साक्षी वामनराव इंगोले, कौटुंबिक जबाबदारी सांभाळून अभ्यासामध्ये सातत्य ठेवून PSI पदी निवड झालेल्या सौ.धनश्री सम्राट जाधव, विकी इसावे,ASO पदावर निवड झालेले विश्वनाथ नरमले,RFO पदी निवड झालेले विश्वजीत खंदारे, सेट परीक्षा मध्ये पात्र झालेले मा.प्रदीप घोडगे, इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेमधील शिष्यवृत्तीधारक कु.श्रेयशी पाईकराव,दिशा पंडित पोलीस पदावर निवड झालेले प्रदीप जावळे या सर्व यशस्वी व गुणवंत विद्यार्थ्यांचा समावेश होता.

सदर मेळाव्याची सुरुवात कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा शाखा हिंगोलीचे सरचिटणीस व अति.सरचिटणीस मा. प्रवीण रुईकर व मा.बबन दांडेकर यांनी आपल्या सुमधुर आवाजातील स्वागत गीताने केली. सदर कार्यक्रमाचे अतिशय अभ्यासपूर्ण व सुनियोजित असे बहारदार सूत्रसंचालन मा.बबन दांडेकर सरांनी केले.

प्रास्ताविकपर मनोगतात मा.रामजी वाकळे सचिव कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा शाखा हिंगोली यांनी विभाग स्तरीय आयोजनाबाबतची संघटनेची भूमिका स्पष्ट करीत कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाभरातील कार्य उपस्थितां समोर मांडले. कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे विभागीय अध्यक्ष मा.राजेश सदावर्ते सरांनी आपल्या मनोगतात संघटनेच्या कार्याची माहिती विशद करत शिक्षक प्रेरणा परीक्षा बहिष्कार व इतर महत्वपूर्ण बाबीवर सर्वांचे लक्ष वेधले.

मा.सतीश कांबळे सरचिटणीस कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य यांनी आपल्या मनोगतात संघटनेचा राज्यभरातील कार्याचा आढावा घेत मा. कृष्णा इंगळे साहेबांच्या कुशल मार्गदर्शनात संघटना अतिशय वेगाने आपले कार्य राज्यभरात वाढवीत आहे असे सांगितले. मा.बी.डी.धुरंधर कार्याध्यक्ष कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य यांनी आपल्या मनोगतात कास्ट्राईब शिक्षक संघटना शिक्षकाच्या विविध प्रश्नाची सोडवणुक आपले कार्य करीत आहे असे सांगत असतानाच मा. कृष्णा इंगळे साहेबांच्या कार्यावर त्यांनी प्रकाश टाकला.

मा.संजय दैने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हिंगोली यांनी मेळाव्यास संबोधित करताना जिल्हाभरातील शिक्षकांच्या प्रश्नाविषयी प्रशासन संवेदनशील असून सर्वच शिक्षक संघटनाच्या सामूहिक प्रयत्नातून शिक्षकांच्या सर्व प्रश्नांची सोडवणूक केली जाईल असे सांगतानाच सेवा निवृतीचे सर्व लाभ मिळवण्यासाठी सर्व शिक्षकांनी आपली सेवापुस्तिका अपडेट करावी असे आवर्जून सांगितले. मा. संदीपकुमार सोनटक्के शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद हिंगोली यांनी आपल्या मनोगतात शिक्षकांनी आपल्या कार्यात नेहमीच सजग राहून विद्यार्थ्याप्रती अधिकाधिक गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत जावा असे सांगितले. जिल्हाभरातील शिक्षकांचे विविध प्रश्न मार्गस्थ करून शिक्षकाना नियमानुसार प्रमोशन दिल्या जाईल असे सांगितले.

मा.कृष्णा इंगळे अध्यक्ष कास्ट्राईब कर्मचारी महासंघ तथा कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य यांनी मेळाव्यास संबोधित करताना आपल्या कार्यकाळातील अनेक महत्वपूर्ण बाबीचा घटनाक्रम सांगत असताना समाजाच्या शैक्षणिक,सामाजिक ऐतिहासिक विकासाची उकल करीत शिक्षकांवर व कर्मचाऱ्यावर होणाऱ्या अन्यायास वाचा फोडून त्यास कसा न्याय मिळवून दिला याबाबतचे त्यांच्या अनुभवातील अनेक घटनाचे दाखले उपस्थितां समोर मांडले.आपल्यावर होणाऱ्या अन्यायास संघटनेच्या माध्यमातून संघटित होऊन त्याचा प्रतिकार केला पाहिजे असे ठासून सांगितले. कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या जिल्हा कार्यकारिणीने शिक्षकांचे प्रश्न शासन दरबारी मांडून ते सोडविले पाहिजेत त्यासाठी राज्य कार्यकारिणी आपल्यास सर्वतोपरी सहकार्य करील असे आवर्जून सांगितले. जवळपास एक तासभर चाललेल्या आपल्या भाषणात मा.कृष्णा इंगळे साहेबांनी उपस्थित सर्वांना संघटनेच्या कार्याबाबत प्रेरित केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.रमेशदादा खंदारे अध्यक्ष कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा शाखा हिंगोली यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मेळाव्यास संबोधित करताना संघटनेच्या जिल्हाभरातील कार्याचा आढावा उपस्थितां समोर मांडला.आमच्या आव्हानास भरघोस प्रतिसाद देत आपण सर्वजण विभागस्तरीय मेळाव्यासाठी उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी मा. बबनराव गायकवाड कास्ट्राईब शिक्षक संघटना तालुका अध्यक्ष हिंगोली यांनी संघटनेच्या संयोजन समितीच्या वतीने विभागीय मेळाव्यास उपस्थित असणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त करून अध्यक्षाच्या परवानगीने कार्यक्रमाची सांगता केली.

कास्ट्राईब शिक्षक संघटनेचा विभागस्तरीय मेळावा यशस्वी करण्यासाठी कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा शाखा हिंगोली चे जिल्हाध्यक्ष रमेशदादा खंदारे, विभागीय उपाध्यक्ष रमेश इंगोले,सरचिटणीस प्रवीण रुईकर,कार्याध्यक्ष वामन इंगोले, कोषाध्यक्ष गंगाधर पाईकराव, सचिव रामा वाकळे, उपाध्यक्ष भीमराव तुरुकमाने,मधुकर भालेराव,गजानन झुंजारे,प्रकाश पंडित ,अतिरिक्त सरचिटणीस बबन दांडेकर ,अनिल कांबळे, सदाशिव चाटसे,सुनील घोंगडे ,श्याम नरवाडे,मुख्य संघटक त्र्यंबकराव पोघे,संघटन सचिव डि.के. बेले ,मिलिंद घोंगडे ,राजेंद्र नरवाडे कार्यालयीन सचिव संतोष सदावर्ते, जिल्हा कार्यकारणी सदस्य भारत मोरे,सी.सी.खिल्लारे,संतोष खिल्लारे शेषराव पडघन,समाधान पाईकराव,महिला प्रतिनिधी ज्योतिका मोरे, मंगला भालेराव, वंदना सरकटे तालुका अध्यक्ष हिंगोली अध्यक्ष:- बबनराव गायकवाड,कार्याध्यक्ष:- दत्तराव अंभोरे,सचिव:- युवराज साठे,कोषाध्यक्ष:- राहुल दांडेकर,उपाध्यक्ष:- समाधान पाईकराव,सारंगधर लोखंडे,रामा आठवले, चांदु इंगोले,सहसचिव:- रवींद्र पठाडे ,राहुल वानखेडे मुख्य संघटक:- प्रशांत कंधारे कार्यालयीन सचिव:- बाबाराव विसावे प्रसिद्धीप्रमुख :- संजीव खिल्लारे तालुका प्रवक्ता:- प्रदीप घोडगे, दिनकर नरवाडे कार्यकारिणी सदस्य :- शालिक कांबळे, मिलिंद बगाटे,विष्णू घनसावंत, सुभाष ठोके ,सिद्धार्थ भगत,विलास वाढवे,कळमनुरी तालुकाअध्यक्ष:- बंडू विठ्ठलराव गुंजकर सरचिटणीस:- सुमेध हटकर अतिरिक्त सरचिटणीस:-श्रीराम किरवले कोषाध्यक्ष:- मोतीराम मोगले कार्याध्यक्ष:- पंकज मेश्राम उपाध्यक्ष:- सुधाकर भुरके सहसचिव:- अमृतराव माहोरे,प्रदीप सोनाळे,मारोती कऱ्हाळे,राजेश साखरे सल्लागार:- केशव फोले, बाजीराव पाईकराव संघटक:- दीपक कटकुरी, माणिक उगले सेनगांव तालुकाअध्यक्ष:- नरेंद्र खिल्लारे उपाध्यक्ष:- परमेश्वर टोम्पे, संतोष खडसे,विजय पंडित सचिव:- भीमराव नेतने सहसचिव:- शालिक गायकवाड, रजनीकांत दांडगे कार्याध्यक्ष:- किशोर जावळे सहकार्याध्यक्ष:- संदीप हनवते कोषाध्यक्ष:- अमोल वाढवे सल्लागार:- जी एस कोकाटे एन.टी.दलसिंगार ,पवळे सर औंढा (नाग.) तालुकाध्यक्ष गोविंद अवसरमले, उपाध्यक्ष सिद्धार्थ बगाटे, सचिव मनोज इंगोले,सहसचिव उमाकांत मुळे, कृष्णा गायकवाड, कोषाध्यक्ष मनोज चाटसे, बाबुराव खंदारे, व्ही. एस. ठोंबरे. वसमत तालुकाध्यक्ष राजकुमार ठोके जिल्ह्यातील शिक्षक मित्र, विविध क्षेत्रांमध्ये कार्य करणारे कर्मचारी,अधिकारी, समविचारी सामाजिक संघटनेचे पदाधिकारी इत्यादी नी परिश्रम घेतले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles