कर्णबधीर दिनानिमित्त जनजागृती उपक्रम; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचे आयोजन

कर्णबधीर दिनानिमित्त जनजागृती उपक्रम; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचे आयोजनपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी

पुणे: गेली 25 वर्षापासून नवजात बालकांपासून 6 वर्ष वयोगटातील कर्णबधीर बालकांना वाचा- भाषा प्रशिक्षण देऊन त्यांच्या पुनर्वसनाचे कार्य करणा-या ‘काॅक्लिआ पुणे फॉर हिअरिंग अँड स्पीच’ या संस्थेच्या वतीने ‘जागतिक कर्णबधिर दिनाचे औचित्य साधून एका विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या उपक्रमाच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्र व सर्व शासकीय व खाजगी रुग्णालये यामध्ये प्रसूतीनंतर त्वरीत नवजात बालकाची श्रवण चाचणी (ओएई) बंधनकारक करण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली. तसे मागणीपत्राचे निवेदन मा. जिल्हाधिकारी, पुणे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. देशातील सर्व कर्णबधीर बालकांना त्यांच्या हक्काचा विकास घडवून आणण्यासाठी कॉक्लिआ, पुणे यांनी बालकांच्या हितार्थ हे कृतीशील पाऊल उचलले आहे.

या मोर्चात काॅक्लिआ पुणे संस्थेचे विश्वस्तमंडळ, अधिकारी वर्ग आणि मोठ्या संख्येने शिक्षक व पालक सहभागी झाले होते. जन्मतः कर्णबधिर बालकांना न्याय मिळवून देण्याच्या या महत्वपूर्ण चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले होते, त्यास उत्तम प्रतिसाद देऊन सुमारे 300 नागरिक मोर्चात सहभागी झाले.

या संदर्भात अधिक माहिती देताना संस्थेच्या प्रतिनिधींनी सांगितले की, या विषयातील जागतिक संशोधना नुसार दर 1000 बालकांमागे 1 ते 4 बालके जन्मतः कर्णबधीर रूपात जन्माला येतात. त्यात २०२१ च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात १९,५२,७२९ इतकी बालके जन्मली.
त्यापैकी; ७,८ ११ बालके जन्मजात कर्णधिर होते. हे व्यंग सहजपणे लक्षात येण्याजोगे नसते. आपले मूल कर्णबधिर आहे हे समाजण्यास पालकांना साधारण 2 ते 3 वर्ष पर्यंतचा कालावधी लागतो. तेथून पुढे तपासणी व उपचार प्रक्रिया सुरु होते.

नेमक्या याच काळात नवजात बालकांचा बौद्धिक विकास झपाट्याने होत असतो. परंतु केवल उशीरा निदान झाल्यामुळे कर्णबधिर बालकांची ही महत्वाची वर्ष विकासापासून अशा बालकांना वंचित राहावे लागते. सर्वसामान्य आयुष्य जगणे अवघड होऊन बसते.ही बालके समाजाचा एक दुर्लक्षित गट ठरतात. म्हणूनच लवकरात लवकर कर्णबधीरत्वाचे निदान होणे गरजेचे आहे, ही गोष्ट लक्षात घेऊन संस्थेने नवजात बालकाची श्रवण चाचणी बंधनकारक करावी, अशी आग्रही मागणी केली आहे. या मागणीसाठी ‘जॉईंट कमिटी ऑन इन्पन्ट हिअरिंग’ (जेसीआयएच, २००७) नुसार श्रवणशक्तीबाबत बालकाच्या जन्मानंतर एका महिन्यातच तपासणी करणे आणि वयाच्या तीन महिन्या पर्यंत श्रवणक्षमता निदान होणे तसेच वयाच्या ६ महिन्यांपर्यंत उपचार सुरू करणे गरजेचे असते.

परंतु दुर्दैवाने सध्या तरी भारतात अशी स्थिती नाही. बालकाचा कर्णदोष निदर्शनास आला तरी कुटुंबाकडून दुर्लक्ष होताना दिसते. शिवाय, ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये श्रवणविषयक (ओएई/एवीआर) सेवा नीटशा उपलब्ध नसतात. त्यामुळे बाळाची तपासणी केली जात नाही आणि श्रवणशक्तीचे मूल्यांकन होऊ शकत नाही. म्हणून शासनाने हा विषय गांभीर्याने घेणे आवश्यक असल्याचे कान नाक घसा तज्ञ डाॅ. वाचासुंदर यांनी दै. मुं. तरूण भारतशी बोलताना आवर्जुन नमूद केले व ही चळवळ अशीच पुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार बोलून दाखवला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles