देव भावाचा भुकेला; नीला पाटणकर

देव भावाचा भुकेलापुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गणांचा आधिपती, तूं गणाधीश
तुझी अनंत रूपे विश्वात, करीसी दुष्टांचा विनाश ॥
बुध्दीदाता गणदेवता, तूं भूवरी येण्या सत्वरी
भक्तगण करती रंगरंगोटी, तुझ्या स्वागता चाले तयारी ॥

श्रीगणेशा वंदन, श्रावण-भाद्रपद हे मराठी महिने सणांचा राजा म्हणून समजले जातात.त्यापैकीच “ गणपती उत्सव “ हा एक सण आहे. गणपती हे दैवत असे आहे की,त्याच्या आगमनाच्या भावनेनं प्रत्येकाचा उत्साह ओसंडून वाहात असतो. जस जशी भाद्रपद चतुर्थी जवळ येऊ लागते तस तशी मूर्तीकारांची रंगरंगोटीची काम जोरात सुरू होतात.वर्षभर कष्ट करून तन्मयतेने मूर्तीस आकार देऊन मूर्ती सजविण्याचे काम अहोरात्र नेटाने चालू असते.
मूर्तीकाराचा मूर्तीला रंगरूप देण्यात हातखंडा असतो.लीलया त्यांचा कुंचला अलगद मूर्ती वरून फिरत असतो.
मूर्तीकाराचा हा पोटापाण्याचा धंदा असला तरी ते नुसते चरितार्थाचे साधन म्हणून त्याकडे बघत नाहीत.
मूर्तीत त्यांच्या स्वत:च्या भावना गुंतलेल्या असतात.मूर्तीत सजीव भाव आणण्यासाठी ते जीव तोडून प्रयत्न करत असतात.

मनातील निर्मळ भाव हातात उतरून ते मूर्तीत आपसुक साकार होत असतात.म्हणूनच प्रत्येक मूर्तीत त्यांचा आत्मा संचार करत असतो. भक्तीभावाने वाजत गाजत उत्साहाने साजरा केला जाणारा हा सण आहे.दीड,पाच,दहा दिवस गणेशाची स्थापना अनेक घरी होत असते.सार्वजनीक रीत्या मोठ्या संख्येने साजरा केला जाणारा हा एकमेव सण आहे.
भक्तगण जेव्हां पुजनासाठी मूर्ती घेऊन जातात तेव्हां मूर्तीकाराच्या डोळ्यात बिदाई केल्याचे मनातील भक्तीभाव तरळताना दिसतात.त्यांच्या साठी ही सुख-दु:ख मिश्रीत आनंदाची गोड अनुभूती असते. अशावेळी पाचदहा रूपये कमी जास्त मिळाले तरी त्याची त्यांना पर्वा नसते.तेव्हां नफातोट्याचा हिशोब बघीतला जात नाही.

भावनेने मन भारावून गेल्यामुळे कधीच पैशाच्या तराजूत त्याचे मोजमाप केले जात नाही.कारण त्यात गरीब-श्रीमंत भेद नसून फक्त भक्तीभाव ओथंबून भरलेला असतो.
मूर्तीवरील कपडालत्ता,दागदागिने हे न बघता भक्तीभावाला आधिक महत्व दिले जाते.देव भावाचा भूकेला असतो.भक्तीत रमलेले भक्त हेच देवाच्या ठायी मोलाचे असतात. दहादिवसाचे गणपती विसर्जीत झाल्यावर थोड्याच कालावधीत मूर्तीकारांचे मूर्ती घडविण्याचे अविरत नित्य नेमाने काम सुरू होते. हे काम अत्यंत जिकीरीचे, मेहनतीचे, नाजुक कौशल्याचे असते. प्रथम माती भिजत ठेवून ठराविक दिवसानी गोळा तयार करून.हाताने अगर साच्याने मूर्तीची घडण केली जाते. कांही दिवसाने प्रकाशात मूर्ती वाळवून त्याचे पाॅलीश केले जाते.मूर्तीवर चिरा,भेगा पडू नये याची काळजी घेतली जाते.खात्री करून नंतर डोळे,हात,चेहरा,सुबक आखिव रेखिव,आकर्षक केले जातात.

मूर्तीत जीवंत भाव निर्मिती करणे ही मूर्तीकाराची हातोटी असते.दागिने,कपडे यात निपुण असणाऱ्यांना ज्याचे त्याचे काम दिले जाते.पितांबर,शेल्याच्या अचूक चुण्या व घड्या हुबेहुब करण्याचे काम कलाकार निष्ठेने काळजीपूर्वक करत असतात. गणपती निर्मितीचे पुण्यकर्म व समाधान कलाकारांना त्यातून मिळत असते.

श्रीमती नीला पाटणकर,शिकागो.
===

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles