झरा संवादाचा..

झरा संवादाचा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

आज आटला असा का, झरा संवादाचा
काटा रुतला कुठे सांग, तुला विवादाचा.. //

हेतू नव्हता कधीही, तुला दुःखावण्याचा
यत्न होता जरूर तो, तुला सुखावण्याचा.. //

कसा देवू पुरावा मी,जागल्या संवेदनांचा
अनुभवला कितीदा तू, सोहळा वेदनांचा.. //

कधी होता हवासा, शब्दस्पर्श सांत्वनाचा
भर अमावस्येत भासे, तो हर्ष चांदण्याचा.. //

होत होतीस व्यक्त तू, कधी बेशक बंधमुक्त
पर होते असह्य आज, मज तुझे मौन सक्त.. //

कधी बिलगून मजला, पूर भावनेस यायचा
आज उमगेना तुझा नूर,का माघार घ्यायचा.. //

दूर जाणार असेल का? हा थवा पाखरांचा
जावे सांगून झाडास, काय गुन्हा पामराचा.. //

विष्णू संकपाळ बजाजनगर, औरंगाबाद
=======

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles