तू चाल पुढं ; सविता वामन

तू चाल पुढं



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

उमलून बघ पुन्हा एकदा,
गराडा असेल तुझ्याभोवती काट्यांचा
रक्तांळून जाईल शरीर तुझे,
उडाला असेल कप्पचा मनाचा
ओरबाडून तुझ्याच भावनांना,
खेळ मांडला असेल तुझ्या अब्रुचा
सोशिकपणा अंगी तुझ्या अवतरलेला,
कुठे थांगपत्ता तुला तुझ्या गुणांचा
मोडतील तुला,तुकड्यात वेचतील,
तुझेच असतील ते तुलाच खेचतील
मागे वळून बघू नकोस तू जराही,
प्रेमाने पाठीत वार आपलेच करतील
चालत रहा तु पुन्हा एकदा नव्याने,
लढण्यासाठी घे तु जन्म नवा
तोडीत जा बुरसटलेली,गंजलेली बंधने,
थोडा माजपणा बाईमाणसातही हवा
लाजेचा पहारा राहूदे डोळ्यात पण!,
अंगारही नजरेत पेरून ठेव थोडा
मोडून पडला पाहिजे समोरचा,
नको ओलावू नुसत्या डोळ्यांच्या कडा
किती सोसायचा बाईपणाचा देखावा,
कधी तरी माणूस म्हणून जगून पहा
आधी प्रेम स्वतःवर कर तु मग,
दुसऱ्यांसाठी जगत रहा.

सौ.सविता वामन ठाणे.
=====

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles