जीवन; वसुधा नाईक

जीवनपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

जी.. जीवनातील सुख, दुःख
व.. वर,खाली,जीवनी चढ,उतार असतातच
न.. नम्रतेने जीवन सुख घ्यावे.

जीवन…जीवनातले चढ, उतार हे जीवनभर चालू असतात. सुख आले तर हुरळून जाऊ नये, दुःख आले तर होरपळून जाऊ नये. हे जर का आपण आपल्या मनाशी ठरवलं तर जीवनात नक्कीच चांगल्या गोष्टींचा उदय होत असतो हे मात्र निश्चित आहे. जीवन हे संघर्षमय लढा आहे. अगदी वेळेच्या संघर्षा पासून ते तुम्हाला मरणाच्या संघर्षा पर्यंत सगळे रोल निभवावे लागतात.

माणूस जन्माला येतो त्यावेळी सुद्धा संघर्ष करूनच जन्म होतो त्याचा. मग समाजात वावरतानाचा संघर्ष वेगळा. शाळेत असतानाचा अभ्यासाचा संघर्ष वेगळा. कॉलेजमध्ये गेल्यानंतर मित्र-मैत्रिणी,कॉलेजचा अभ्यास,नोकरी कुठे आणि कशी मिळते हा संघर्ष वेगळा. एकूण काय तर प्रत्येक कामासाठी आपल्याला झटावेच लागते. हे जीवनासाठी झटणे म्हणजे संघर्ष करणे होय. म्हणून म्हणते जीवन हे संघर्षमय आहे.

जे सुख आपण उपभोग घेणार आहोत त्यामागे सुद्धा आहे सुख मिळण्यासाठी आपण संघर्ष केलेला असतो. दुःखाशिवाय सुख नाही असे म्हणतात ते अगदी खरे आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःखाची झालर असतेच असते. दुःख उपभोगल्याशिवाय सुख आपल्या पदरात पडत नाही. याचे अनेक अनुभव आहेत पाठीशी आणि म्हणून हे लिहिण्याचा मी प्रयत्न केला आहे. दुःखाची शृंखला संपली म्हणता,म्हणता सुख पदरात येते.आणि सुख पदरात आल्यानंतर त्याचा उपभोग घेता घेता दुःख कधी पाठीशी लागते हे समजतच नाही.

जीवनामध्ये सुखदुःखाचा पाठशीवणीचा खेळ चालू असतोच . आठवणींच्या मेळाव्यामध्ये रमून जावे. आठवणींचा हिंदोळा हालवत असताना सुखाचेच झोके मात्र नित्य घ्यावे. आणि याच जन्मी आनंदाने सुख उपभोगावे. काय माहिती आपल्याला परत माणसाचा जन्म मिळेल न मिळेल. जीवन दिले देवाने खूप सुंदर, त्याला छान हसत सामोरे जायचे. आनंदाने जगायचे. दुःखला बाजूला सारायचे. समाजात सुखाचे वाटप करायचे. हाच जीवनाचा आनंद घेऊ या.

आनंद या जीवनाचा
सुगंधापरी दरवळावा
पाव्यातला सूर जैसा
ओठातुनी ओघळावा…..

वसुधा वैभव नाईक
धनकवडी, जिल्हा- पुणे
=====

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles